Tarun Bharat

पणजी मधील घोटाळे आणि गुन्हेगारीचे प्रमुख बाबूशच आहेतः

Advertisements

पणजी / प्रतिनिधी

बाबूश मोनसेरात यांनी पणजी महापालिका निवडणुकीत 80 टक्के नवीन चेहरे उभे करण्याची धमकी दिली होती,ही एक नियंत्रण ठेवण्याकरता केलेली खेळीच होती, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

वाल्मिकी यांनी सीसीपीला कोणतीही सूचना न देता जप्त केलेल्या छोटय़ा व्यावसायिकाचा माल परत करण्यासाठी सीसीपीला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आणि सीसीपी माल परत करण्यात अपयशी ठरल्यास बाजार संकुलात आंदोलन करण्याची धमकी दिली.

“सीसीपीने आमच्या छोटय?ा विपेत्यांचा माल कोणतीही सूचना न देता जप्त केला आहे. त्यांनी मध्यरात्री चोरटय़ांप्रमाणेच हा प्रकार केला. सीसीपीने 48 तासांच्या आत माल परत केला पाहिजे, यात ते अपयशी ठरल्यास आम्ही विपेत्यांसोबत मिळून बाजार संकुलात निषेध नोंदवू.” ” वाल्मिकी म्हणाले

“बाबूश म्हणतात की त्यांना 80ज्ञ् नवीन चेहरे उभे करायचे आहेत पण ते म्हणाले की सध्याच्या नगरसेवकांच्या मुलांनी देखील निवडणूक लढवावी.यातून ते फक्त कौटुंबिक राजकारणाला प्रोत्साहन देत आहेत.”

आपचे नेते वाल्मीकि नाईक म्हणाले की, पणजीचे लोक अस्वस्थ आहेत आणि मोनसेरात यांच्या गुंडांनी कंटाळलेले आहेत आणि ते त्यांना नक्की दार दाखवतील,म्हणून बाबुश यांना जुन्या लोकांना मते मिळणार नाहीत म्हणून नवीन चेहरे हवे आहेत.

वाल्मीकी यांनी बाबूश यांच्या हकालपट्टीची मागणी करताना ते म्हणाले की, “गेल्या 18 वर्षात पणजीमध्ये झालेल्या सर्व घोटाळय़ांचे मुख्य सुत्रधार मोनसेरात आहेत.”

ते म्हणाले की, मोनसेरात आपल्या लहान मुलांबरोबर लपून बसले आहेत आणि आता जुन्या व्यक्ती थकून बसल्या आहेत म्हणून नवीन लोकांना शोधू इच्छित आहे.

त्यांनी निदर्शनास आणून दिले की, मोनसेरात एफएआर-एफएसआय घोटाळा, ओडीपी घोटाळा आणि पीडीए उत्तर गोवा आणि बृहत्तर पणजी या दोहोंसाठी जबाबदार आहेत.

आपच्या नेत्या सेसिल रॉड्रिग्ज म्हणाल्या की, ’आप’ पणजीबरोबर तळीगाव विलीन करण्यास विरोध करेल, बाबूश हे त्यांच्या बिल्डर लॉबी मधील मित्रांच्या फायद्यासाठी हे करू इच्छित आहेत, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की, “तळीगावचची जनता जास्त खर्चात पडेल, या गोष्टीबद्दल त्यांना काळजी वाटत नाही, तसेच तळीगाव मधील रहिवाशांना यामुळे जास्त त्रास होईल, याचीही त्यांना परवा नाही.”

वाल्मिकी म्हणाले की, सीसीपीचे नगरसेवक त्या विपेत्यांवर दहशत गाजवत आहेत, ज्यांनी नगरसेवकांनी केलेल्या खरेदीसाठी पैसे न घेण्यास भाग पाडले होते.

Related Stories

राज्यात 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद

Amit Kulkarni

लोकांना स्वयंपूर्णतेकडे वळविणे हाच जनसंपर्क यात्रेचा उद्देश

Amit Kulkarni

करासवाडा येथे वीज सबस्टेशनचे उद्घाटन

Omkar B

कुठ्ठाळीत गिरीष पिल्लेच योग्य उमेदवार

Patil_p

ध्येयवादी पर्रीकर सर्वांच्या स्मरणात राहणार

Patil_p

मेरशी पंचायतीच्या माजी सरपंचाची आत्महत्या

Tousif Mujawar
error: Content is protected !!