Tarun Bharat

पणजी मनपा क्षेत्रात आरोग्य सर्वेक्षण सुरू

प्रतिनिधी / पणजी

पणजी महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 चे आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यासाठी एकूण 45 गट कार्यरत झाले आहेत. प्रत्येक गटात पाच ते सहा जणांचा समावेश असून सर्व कर्मचाऱयांच्या नावाचा / गटांचा आदेश पणजी मनपा आयुक्त संजित रॉड्रीग्स यांनी जारी केला आहे. काल सोमवार दि. 13 रोजीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून ते संपेपर्यंत चालू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

बीएलओच्या नेतृत्त्वाखाली ही पथके स्थापन करण्यात आली असून पणजी शहरातील सर्व रहिवाशांचे सर्वेक्षण ती पथके करत आहेत. घरोघरी भेटी देऊन ते होत असून सर्वांनी सहकार्य द्यावे व खरी माहिती देण्याती यावी असे आवाहन पणजी मनपातर्फे करण्यात आले आहे. रायबंदर, कांपाल, मळा, कोर्तीन, आल्तिनो, सांतइनेज, बॉक द व्हॉक, मिरामार, टोंक, भाटले, ताळगाव, करंजाळे, मार्केट व पणजी शहर अशा विविध भागात सदर पथके तैनात करण्यात आली आहेत. पणजी मनपाचे सुमारे 250 कर्मचारी, अधिकारी या कामात गुंतले असून या सर्वेक्षणातून पणजीतील रहिवाशांच्या एकंदरीत आरोग्यबाबतचा अहवाल समोर येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पणजी शहराच्या विविध भागात औषध फवारणी, सॅनिटायझेशन, स्वच्छता साफसफाई अशी मोहीम पणजी मनपातर्फे चालू असून एक दिवसाच्या अंतराने कचरा उचलही करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पणजीच्या विविध वॉर्डात पावसाळीपूर्व साफसफाई, गटार उपसणे अशी कामे चालू असून पणजी मनपाचे कामगार करीत आहेत. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी पणजी मनपातर्फे सर्व ती उपाययोजना करण्यात येत आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

Related Stories

मयडेच्या माजी पंच उर्मिला राऊळ यांचे निधन

Omkar B

राष्ट्रवादीचा संकल्प २०२४ चा, स्वबळासह मुख्यमंत्री करण्याचा निर्धार

Archana Banage

फोंडय़ात रंगला ‘डीजीटल राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव’

Amit Kulkarni

चढय़ा दराने खरेदी करूनही उद्योगांना निकृष्ट वीजपुरवठा

Amit Kulkarni

वर्षभरात दहा लाख रोजगार देण्याचे वचन केंद्र सरकार पूर्ण करेल

Amit Kulkarni

पोंबुर्फा खाजन रस्ता खाऱया पाण्यामुळे धोकादायक स्थितीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!