Tarun Bharat

पणजी मनपा, बहुतांश पालिकांचे कर्मचारी मार्चच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

त्वरित वेतन फेडावे : पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांचे पालिका संचालकांना पत्र

प्रतिनिधी / मडगाव

कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. याचे विपरित परिणाम सर्वत्र जाणवत असून गोवा त्यास अपवाद नाही. पालिकांचे सफाई कामगार आपली सेवा अविरत पुरवत आहेत. मात्र पणजी महापालिका व अन्य बहुतांश पालिकांनी अजूनही पालिका कर्मचाऱयांना मार्च महिन्याचे वेतन दिलेले नसून ते त्वरित देण्यात यावे, अशी मागणी गोवा पालिका कर्मचारी संघटनेने केली आहे.

गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी पालिका संचालक तारिक थॉमस यांना यासंदर्भात एक पत्र लिहून पालिका कर्मचाऱयांना अजूनही मार्च महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे नजरेस आणून दिले आहे. वेतन उपलब्ध न झाल्याने पालिका कर्मचाऱयांना जीवनाश्यक साहित्य तसेच जीवरक्षक औषधे विकत घेणे शक्य होत नसल्याचे प्रभू यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.

पालिका कर्मचाऱयांनाही विमा, अतिरिक्त वेतन द्या

पणजी महापालिका आणि अन्य सर्व पालिकांना फिल्डवर कार्यरत असलेल्या सर्व पालिका कर्मचायांना मास्क, हातमोजे पुरविण्याचे निर्देश पालिका संचालकांनी द्यावेत तसेच हा साठा मुबलक प्रमाणात असेल याची काळजी घ्यावी, असे या पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱयांना विमा व अतिरिक्त वेतन देण्याची घोषणा केली आहे. आमचे कर्मचारीही कठीण स्थितीत काम करत असून त्यांनाही विमा आणि अतिरिक्त वेतन द्यावे, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.

गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल शिरोडकर यांनी मडगाव व अन्य एक पालिका सोडल्यास पणजी महापालिका व अन्य पालिकांनी मार्च महिन्याचे वेतन अजूनही न फेडल्याचे संघटनेच्या नजरेस आणून दिल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पालिका संचालकांना पाठविण्यात आलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही पाठविण्यात आल्याचे प्रभू यांनी सांगितले.

Related Stories

आता म्हादईसाठी ‘जनमत कौल’ घेण्यात यावा

Patil_p

वास्को खारवीवाडा भागात अतिक्रमणांविरूध्द पालिकेची कारवाई, स्थानिकांकडून हंगामा, कारवाईला आक्षेप

Amit Kulkarni

शेळ-मेळावली येथील साकववजा पूल धोकादायक अवस्थेत

Amit Kulkarni

‘बसेरा’तर्फे सुरक्षाकर्मींना कमी दरात जेवणाची सोय

Patil_p

सांखळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची केंद्रीय समिती जाहीर

Amit Kulkarni

आंचिमचा आज समारोप

Patil_p