Tarun Bharat

पणजी मार्केट आजपासून खुले

प्रतिनिधी / पणजी

पणजीतील मुख्य मार्केट आज गुरुवारपासून खुले करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वा. पर्यंत हे मार्केट खुले रहाणार आहे. तब्बल 43 दिवसानंतर पणजी मार्केट खुले होत आहे. मार्केट खुले करण्याच्या दृष्टीने मनपाने सर्व तयारी केली आहे. मार्केटचा प्रवेश द्वारासमोर सामाजिक दुरी राखण्यासाठी मार्किंगही करण्यात आले आहे. एकावेळी केवळ 50 लोक मार्केटमध्ये असतील, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

पणजीतील मुख्य मार्केट गेले 43 दिवस बंद राहिले. लॉकडाऊनच्या काळात पणजी मार्केट पूर्णपणे बंद राहिले. त्याचबरोबर बाजूचे जुने मार्केटही बंद होते. जुने मार्केट दोन दिवसाअगोदर खुले केले आहे. आता आजपासून नवीन मार्केट खुले करण्यात येत आहे. पूर्ण मार्केट मनपाने सेनीटाईस केले आहे. आता सामाजिक दुरी राखण्यासाठी मार्किंगही केले आहे. हल्लीच भाजी विक्रेत्यांना आयनॉक्स यार्डमध्ये भाजी विकण्यास मान्यता दिली. त्यामुळे सध्या आयनॉक्स यार्डमध्ये भाजी विक्री होत आहे.

पुरुमेतांची फेरी 26 ते 31 मे पर्यंत

पुरुमेतांची पारंपरिक फेरी 26 ते 31 मे पर्यंत पणजीत सिने नॅशनल रस्त्यावर भरविण्यात येणार आहे. दरवर्षी पणजीत पुरुमेतांची फेरी भरविली जाते. पावसाळी बेगमसाठी लोक या फेरीची प्रतीक्षा करतात. सुकी मिरची, चवळी, हळसांदे, चिंच गोळे, गावठी कांदे, गावठी तांदूळ, कोकम आदी साहित्याची खरेदी, विक्री या फेरीमधून केली जाते. म्हापसा मार्केट बंद आहे. त्यामुळे गावठी साहित्य विक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे मनपाने या सर्व विक्रेत्यांना पणजीत विक्रीसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना या फेरीमध्ये साहित्य विक्री करायची आहे त्यांनी मनपाकडे नोंदणी करावी, सिने नॅशनल समोरील रस्ता बंद करून सहा दिवस ही फेरी चालणार असल्याचे महापौर मडकईकर यांनी सांगितले.

Related Stories

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची गंगा आणली

Amit Kulkarni

पत्रकार गोविंद खानोलकर यांचे अपघाती निधन

Patil_p

भारतीय नौदलाचे एअर स्क्वॉड्रन 316 दाबोळीतील आयएनएस हंसवर कार्यान्वीत

Amit Kulkarni

मडगाव पालिकेत डेटा ऑपरेटरच्या जागा भरताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

Amit Kulkarni

मोपासाठी 7218 झाडे कापणार

Amit Kulkarni

पडीक जमिनीवर चिंचोणेतील शेतकऱयांनी केली सामुदायिक शेती

Amit Kulkarni