Tarun Bharat

पणजी वासीयांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झटताहेत महापौर

Advertisements

आतापर्यंत 4 हजार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा : सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चालते काम

प्रतिनिधी/ पणजी

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचा गोमंतकीयांना जाणवणारा तुटवडा दूर करण्याच्या बाबतीत अनेक आमदारांकडून नागरिकांना असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसताना याबाबतीत मदत करण्याकरिता ठिकठिकाणचे नगरसेवक, नगराध्यक्ष, पंच, सरपंच पुढे सरसावल्याचे दिसून येते. त्यात पणजी महानगरपालिकेचे महापौर उदय मडकईकर यांचाही समावेश होतो.

गरजेप्रसंगी उपयोगी पडणारी व्यक्ती ही आपली मित्र बनून जाते. तसे महापौर मडकईकर यांच्या बाबतीत होऊ लागले असून ते पणजी मनपा क्षेत्रातील नागरिकांसाठी धावाधाव करून मार्केटिंग फेडरेशन व इतर खासगी दुकानदारांकडून खाद्यान्न व अन्य जीवनावश्यक वस्तू एकत्र करून घरोघरी पोहोचविण्याचे काम करू लागले आहेत. आतापर्यंत 4 हजार नागरिकांपर्यंत या वस्तू पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे.

दररोज 1 हजारपेक्षाही जास्त फोन

आमच्याकडे दररोज 1 हजारपेक्षाही जास्त फोन येतात.

 शिवाय आता व्हॉट्सऍप व इतर माध्यमांतून आम्ही जनतेच्या ऑर्डर्स घेऊन त्यांना त्यांच्या गरजेनुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहोत.
दररोज रात्री साधारपणपणे 1 पर्यंत आम्ही सामानाची बांधाबांध करून मनपाचे कर्मचारी तसेच आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी सामान पोहोचवितो. अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील याकामी आम्हाला सहकार्य करतात, असे मडकईकर यांनी          सांगितले.

पुत्राचीही मदत

रविवारी रात्री 2.30 पर्यंत आम्ही पणजीतील विविध घरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले, असे त्यांनी सांगितले. महापौर उदय मडकईकर यांचे सुपुत्र अद्वैत मडकईकर व त्यांच्या अन्य मित्रांनी देखील रात्री 2.30 पर्यंत अनेकांच्या घरांमध्ये जाऊन सामानाचे वितरण केले.

कोल्हापूरहून माल आणायला परवानगी

बाजारात जे दर आहेत त्यापलीकडे कोणाकडूनही जादा रक्कम घेतली जात नाही. दुर्दैवाने आता बराच माल संपलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरहून माल आणायला द्यावा यासाठी सरकारकडून परवानगी मागितली असता मंत्री गोविंद गावडे यांनी लगेच परवानगी दिली आहे, अशी माहिती मडईकर यांनी दिली.

मध्यरात्र उलटल्यानंतरही चालते काम

पणजीकरांना जीवनावश्यक वस्तूंचा घरबसल्या पुरवठा करताना अनंत अडचणी येतात. परंतु त्यावर मात करून मनपा हे काम करत आहे. मनुष्यबळ कमी आहे.

तरी देखील हा उपक्रम राबविण्यासाठी सकाळी जे काम सुरू होते ते मध्यरात्र उलटल्यानंतरही चालू राहते, असे महापौर उदय मडकईकर       म्हणाले. 

मनपाचे सभागृह, महापौरांचे दालन वस्तूंनी भरले

मनपाचे सभागृह जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले आहे. महापौरांच्या दालनातही मोठय़ा प्रमाणात वस्तू सध्या येऊन पडल्या आहेत. काही ग्राहक आमच्याकडे ऑर्डर्स पाठविताना जॅम, बटर, चीज, मोठमोठे चॉकलेट्स व तत्सम विविध वस्तूही मागतात. अर्थात आम्ही केवळ डाळ, तांदूळ, नारळ, तेल, हळद, मिरची पावडर, मीठ, साखर, गूळ, वाटाणा, मूग वगैरे वस्तूच देतो. आतापर्यंत 4 हजार नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असे मडकईकर यांनी सांगितले.

Related Stories

गोव्यात येणाऱया उद्योगांना अच्छे दिन !

Amit Kulkarni

पाचशे चौ.मी.भूखंडातील बांधकामास दिलासा

Amit Kulkarni

फोंडय़ात भव्य पुस्तक प्रदर्शन

Patil_p

टिळकांचे विचार आजही संयुक्तिक

Amit Kulkarni

सरकारच्या अपयशामुळे गुन्हेगारी, भ्रष्टाचाराने गोव्याला पोखरले

Omkar B

कुळे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास

Amit Kulkarni
error: Content is protected !!