Tarun Bharat

पणजी स्मार्ट सिटीचे 300 कोटी कुठे वापरल्याची माहिती नाही

महापौर उदय मडकईकर यांचे प्रतिपादन

पणजी

स्मार्ट सिटी महामंडळाला 300 कोटी रुपये आतापर्यंत मंजुर झाले आहेत. परंतु यादरम्यान अम्ही या महामंडळाचे सदस्य नसल्याने सदर पैसे कुठे वापरण्यात आले आहे हे आम्हाला माहीत नाही आहे. आत्ताच माझे व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांना या मंडळाचे सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱया काही दिवसांतच या संदर्भातील चित्र स्पष्ट होणार असे. महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.

आम्ही ज्यावेळी या महामंडळाचे सदस्य नव्हतो तेव्हा आम्ही पैसे विणाकारण वापरल्याचे आरोप करत होतो, कारण पैसे वापरण्यात येत होते परंतु पणजीचा कुठल्याही प्रकारे विकास झाला नाही. आता आम्हाला या महामंडळाचे सदस्यत्व मिळाले आहे परंतु आमचा कार्यकाळ आणखी काही महिन्यात संपणार आहे. त्यामुळे आमच्याकडे जेवढा वेळ आहे त्यावेळेत लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या हीतासाठी व पणजीच्या विकासासाठी काम करणार आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.

माजी आमदाराने फक्त नारळ फोडले

बाबुश मोन्सेरात व पालिकेने मिळून यावर्षी अनेक महत्वाची कामे हाती घेतली होती, व ती योग्य प्रकारे पूर्ण देखील केली. गेली कित्येक वर्षे राजधानीतील अनेक महत्वाचे रस्ते पहिल्याच पावसात पाण्याखाली जात होते, परंतु यावर्षी आम्ही केलेल्या कामामुळे रिकोर्ड ब्रेक पाऊस पडून देखील पणजीत कुठेही पाणि साचले नाही. पणजीच्या माजी आमदाराला हे जमले नाही त्यांनी फक्त नारळ फोडून उद्घाटनाचे सत्र सुरु केले. त्या प्रकल्पाचे किंवा वास्तुचे काम पूर्ण झाले की नाही देखील ते पाहीले नाही. निवडणूका जवळ आली की प्रसिध्दीसाठी उद्घाटना सत्र सुरु केले जाते. असे मडकईकर म्हणाले.

Related Stories

मोपा विमानतळासाठी केंद्राचा सुधारीत पर्यावरण दाखला

tarunbharat

राज्यपाल पिल्लई यांचे 24 रोजी शिरोडा दर्शन

Amit Kulkarni

वादळामुळे रस्त्यावर पडलेली झाडे हटविली

Amit Kulkarni

ईलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी राज्यात लवकरच खास योजना

Amit Kulkarni

येत्या 10 महिन्यात कला अकादमीचे होणार नूतनीकरण

Amit Kulkarni

सुर्ला – कोठंबी सोसायटीची वार्षिक सभा उत्साहात

Amit Kulkarni