Tarun Bharat

शिराळातील पणूंब्रे वारुण येथे साकारतेय वीरगळ स्मारक!

Advertisements

शिराळा / प्रतिनिधी

पणूंब्रे वारुण ता.शिराळा येथे वीरगळ स्मारक उभारले जात आहे. शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच असे वीरगळ स्मारक उभारण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान मंडळाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिराळा तालुक्यामध्ये सापडणारे वीरगळ प्राचीन गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहेत.पण काळाच्या ओघात या वीरगळांच महत्व कमी झालं आणि त्यांची दुरवस्था झाली.असेच दुरावस्थेमध्ये असणारे वीरगळ पणूंब्रे वारूण मधील युवकांनी संवर्धित करण्याचा विडा उचलला.श्री शिवप्रतिष्ठाण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्णत्वास नेले.

सुरवातीला गावातील लोकांना वीरगळ म्हणजे काय हेच माहित नव्हते. त्यासाठी सामाजिक माध्यमांचा योग्य तो वापर करून संपूर्ण गावामध्ये जनजागृती केली.लोकांना वीरगळांचे महत्व पटल्यानंतर ,महादेव मंदिर परिसरातील वीरगळ संवर्धनाला सुरवात केली.लागोपाठ तीन संवर्धन मोहिमा घेऊन वीरगळ परिसर स्वच्छ केला. त्यानंतर स्मारक उभारण्याला सुरवात केली.स्मारक उभारणीसाठी लागणार निधी श्री शिवप्रतिष्ठाण कला ,क्रिडा ,सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाने दिला.

“शिराळ्यात पहिले वीरगळ स्मारक पणूंब्रे वारुण येथे उभा राहिलंय,ही सर्व गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.भेट देणाऱ्या सर्वांचे स्वागतच राहिल.अशीच स्मारके गावोगावी उभारायला हवीत.जेणेकरून येणाऱ्या पिढयांना गावचा इतिहास समजेल.”

विनायक पाटील (वीरगळ अभ्यासक)

Related Stories

आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज नव्हते; SIT चा मोठा खुलासा

datta jadhav

कोल्हापूर : इचलकरंजीत कोरोनाने दोघांचा मृत्यू : मृतांची संख्या १६ वर

Archana Banage

कस्तुरीला प्रदान करणार ‘शुभेच्छा व राष्ट्रध्वज’

tarunbharat

जतच्या तिकोंडीत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचा लावला फलक

Archana Banage

सांगली संस्थानच्या गणरायाला शाही थाटात निरोप

Archana Banage

पत्रकारांचे शरद पवारांना साकडे

Archana Banage
error: Content is protected !!