Tarun Bharat

”…पण भारत सरकारला याची चिंताच नाही”

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील लसीकरण स्थितीवरून राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, लसीकरण हीच महामारीला नियंत्रणात आणण्याची किल्ली आहे. मात्र, भारत सरकारला याची चिंताच नाही, असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबरोबर त्यांनी एक ग्राफदेखील शेअर केला आहे. यात रोज होणाऱ्या लसीकरणाचा आकडा घसरल्याचे दाखवण्यात आले आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी एक बातमी ट्विट केली होती. त्याला राहुल गांधी यांनी कॅप्शन देत, “एक तो महामारी और उस पर प्रधान अहंकारी”, असे लिहिले होते. राहुल यांनी ट्विट केलेल्या बातमीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या आरोपांसंदर्भात भाष्य करण्यात आले होते.

Related Stories

दिल्लीत 127 नवे कोरोना रुग्ण; 2 मृत्यू

Tousif Mujawar

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

Patil_p

काश्मीरमध्ये हिमस्खलन, तीन जवान शहीद, एक बेपत्ता

prashant_c

सहा रेल्वे स्टेशनसह मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

datta jadhav

आता भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार आर्यन खानची बाजू

Archana Banage

मुख्यमंत्री शिंदेंची थेट शिवरायांशी तुलना ; आदित्य ठाकरे म्हणाले, हा काही चुकून आलेला शब्द नाही…

Archana Banage