Tarun Bharat

…पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते : राहुल गांधींचा हल्लाबोल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर ‘आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या’. दिल्लीत पेट्रोलची किंमत 100.21 रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर 89.53 रुपयांवर पोहोचले आहे’ अशी बातमी शेअर केली आहे.


पुढे ते म्हणाले, ‘तुमची गाडी पेट्रोल चालत असेल किंवा डिझेलवर, मोदी सरकार कर वसुलीवर चालते!,’ असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
मागील काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे आणि 11 जून रोजी पक्षानेह त्याविरोधात देशव्यापी आंदोलनही केले होते.


देशभरात अनेक ठिकाणी इंधनदरांनी शंभरी पार केली आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब आदी ठिकाणी पेट्रोलने आधीच शंभरी गाठली होती. या यादीत आता सिक्कीमची भर पडली आहे. तर महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूर यापूर्वीच पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. 

Related Stories

14 एप्रिल रोजी सुरू होणार पंतप्रधानांचे संग्रहालय

Abhijeet Khandekar

उग्रवादी संघटनांकडून आसाममध्ये जाळपोळ

Patil_p

दिल्लीत मागील 24 तासात 266 नवे रुग्ण; 7 मृत्यू

Tousif Mujawar

यूपी : मुलायम सिंह यादव यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Tousif Mujawar

असत्यमेव जयते.. जप्तीनंतर संजय राउतांचं ट्विट

Abhijeet Khandekar

भारत-नेपाळ संयुक्त सराव सोमवारपासून

Patil_p