Tarun Bharat

पतंगाच्या मांजामुळे युवकाला 32 टाके

Advertisements

 नगर / प्रतिनिधी :

पतंगाच्या चायनीज मांजामुळे 18 वर्षांचा युवक जखमी झाला असून, त्याला तब्बल 32 टक्के पडले आहे. सुदैवाने या तरुणाची प्रकृती ठीक असून, तो बालंबाल बचावला आहे.

अरबाज शेख असे या 18 वर्षाच्या युवकाचे नाव आहे. अरबाज शेख हा युवक बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंग उडवणाऱयाचा नायलॉनचा मांजा त्याच्या गळय़ाला अडकला. त्याच्या हे लक्षात येताच त्याने तो लागलीच काढण्याचा प्रयत्न केला.

  मात्र, हनुवटीखालील भागाला तो अडकला. त्यात तो ओढला गेल्याने हा भाग कापला गेला. त्यामुळे मोठी जखम होऊन त्यातून रक्त वाहू लागले. आजूबाजूच्या लोकांनी त्याला तेथे जवळच असलेल्या डॉ. सागर बोरुडे यांच्या रुग्णालयात नेले. त्यांनीही तातडीने जखम साफ करून त्यावर टाके टाकले. हनुवटीला अडकल्यावर मांजा ओढला गेल्याने हनुवटीच्या वरच्या भागही कापला गेला. हा सर्व भाग टाके घालून शिवावा लागला असून, त्यासाठी डॉ. बोरुडे यांनी आपले कौशल्य पणास लावले. अरबाजची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. बोरुडे यांनी सांगितले.

Related Stories

अक्कलकोट शहरात भाविकांना मनाई

Archana Banage

गौरी तावरे-थोरात मिसेस हेरिटेज स्पर्धेसाठी करणार भारताचे प्रतिनिधित्व

Archana Banage

विनापरवाना मुरूम वापरल्याने 3 कोटी 4 लाखाचा दंड

Abhijeet Khandekar

वडिलांच्या अस्थीविसर्जनासाठी गोव्याचे उपमुख्यमंत्री पंढरपुरात

Archana Banage

पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य : अरण्यऋषी चितमपल्ली

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

Archana Banage
error: Content is protected !!