Tarun Bharat

‘पतंगें’ची दादागिरी थांबणार कधी?

कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे भलतेच डोक्यात ‘संजय’ साहेबांच्या

प्रतिनिधी/ सातारा

सध्या कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांना अधिकार दिले असले तरीही त्या अधिकाराचा गैरवापर करणे चुकीचे आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे कारभारी जरा हवेतच सध्या आहेत. त्यांना वाटते की आपण जिह्यातील इतर सर्व पोलीस ठाण्यापेक्षांमधील अधिकाऱयांपेक्षा आपणच भारी आहोत. पतंगेंची दादागिरी वाढली असून सर्वसामान्यांवर रुबाब गाजवत आहेत. त्यामुळे सामान्य माणसांच्या मनात पोलिसांच्याबद्दल चिड येवू लागली आहे.

लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकाऱयांनी नियम तयार केले. पालकमंत्र्यांनी आणि राज्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले म्हणून जिह्यातील पोलीस यंत्रणा विनाकारण फिरणाऱयांच्यावर कारवाई करते आहे. परंतु सातारा शहरात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे कारभारी संजय पतंगे यांचा जरा जास्तच उतमात सुरु आहे. ते पोलिसातील भाई बनू लागले आहेत. कायद्याच्या आडून सर्वसामान्यांच्यावर दादागिरी करत लाठीकाठीचा विनाकारण प्रसाद माहिती न घेता देत आहेत. जरी महत्वाच्या कामानिमित्ताने बाहेर पडलेल्यांनाही त्याचा फटका बसत आहे. सध्या पतंगेंचे संजय खूपच हवेत आहेत. त्यांच्याकडून दडपशाही, जुलूमशाही सुरु असून नागरिकांबाबत शाहुपूरी पोलिसांच्याबाबत तीव्र चीड निर्माण होवू लागली आहे.

शेतकरी हा सगळय़ांचा तारणहार आहे. शेतकऱयांना सध्या पेरणीकरता खतेबियाणे लागतात. ती खरेदी करण्यासाठी व नेण्यासाठी सातारा तालुक्यातील शेतकरी पोलिसांच्या भितीने साताऱयात येतच नाहीत. आले तर त्यांना बियाण्यासाठी खताच्या दुकानात द्यायचे पैसे पोलिसांच्या दंडाला द्यावे लागत आहेत. दुकानापर्यंत पोहचले अन् दुकानाच्या दारात उभे राहिले तरीही अडचण. तेथेही पोलीस आहेत. कोरोनाची भिती प्रत्येकाला आहे. परंतु कोरोनापेक्षा पोलिसांचीच भिती सर्वसामान्यांच्या मनात मोठी आहे. त्यातल्या त्यात सातारा जिह्यात शाहुपूरी पोलीस ठाण्याचे संजय पतंगे यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यांनी गेल्या चार दिवसांपूर्वी महिलांनाच चक्क काठीचा प्रसाद देवून गाडीत बसायला भाग पाडले. त्या महिला कशाला आल्या होत्या तेही जाणून घेतले नाही. तसाच प्रकार खत विक्री करणाऱया व्यापाऱयांना थेट आरेतुरे करत अक्कल काढत दमदाटीची भाषा करत कायदेशीर कारवाईची धमकी पतंगे साहेबांनी दिल्याचे सातारकरांनी पाहिले. त्यामुळे शेतकऱयांप्रती किती कळवळा शाहुपूरी पोलिसांना आहे याचीच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे.

मांजरे साहेबांचा आदर्श घ्या

पतंगे साहेब खरोखरच तुम्ही कायद्याच्या नावाखाली विनाकारण नागरिकांना त्रास देवू नका. सध्या शेतकऱयांच्या खरीप हंगाम आहे. या हंगामात शेतकरी खते, बियाणे न्यायया येणार. परंतु तुम्ही जर त्या शेतकऱयांच्यावर व खते बियाण्यांची विक्री करणाऱयांच्यावर जर कारवाई करणार असाल तर हे राज्य सरकार किती शेतकऱयांच्या हिताचे आहे हेही यावरुन स्पष्ट होते. त्यातल्या त्यात किमान शेजारच्या पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचा तरी तुम्ही आदर्श घ्या, असा सुर व्यापाऱयांच्यामधून उमटू लागला आहे. त्यांच्या दडपशाही विरोधात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

Related Stories

वाळवा येथे पोलीस कर्मचाऱ्यांसह तीघे कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

मराठा समाजाने ठरवले तर एका दिवसात मस्ती उतरेल

Patil_p

पंतप्रधान कार्यालयाने घेतली शेतकऱयांच्या तक्रारीची दखल

Patil_p

भारताच्या आयटी नियमांवर आता ‘युएन’चा आक्षेप

Patil_p

ऍक्सेलसेन, युफेई यांना विजेतेपद

Patil_p

बार्सिलोनाचा व्हिलारेलवर विजय

Patil_p