Tarun Bharat

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला केंद्र सरकारची परवानगी; पण…

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाला केंद्र सरकारने सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनिल हे कोरोनावरील औषध म्हणून न विकता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून विकावे, असे आयुष्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाने पतंजलीला दिलासा मिळाला आहे.

पतंजलीचे ‘कोरोनिल’ हे औषध तीन दिवसात कोरोना रुग्ण बरा करते, असा दावा करत योगगुरू बाबा रामदेव यांनी हरिद्वारच्या पतंजली योगपीठात मागील आठवड्यात कोरोनिलचे लाँचिंग केले होते. मात्र, आयुष्य मंत्रालयाने बाबा रामदेव यांच्या दाव्यावर आक्षेप घेत औषधाच्या विक्रीला परवानगी नाकारली होती. केंद्र सरकारने नोटीस दिल्यानंतर पतंजलीने आपला दावा मागे घेतला होता. 

दरम्यान, आयुष मंत्रालयाने या औषधाची चाचणी घेतली. त्यानंतर या औषधाला रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे औषध म्हणून विक्री करण्यास परवानगी दिली आहे. 

Related Stories

क्रिकेट स्पर्धेनंतर घरी परतत असताना डबल मर्डर..!

Rohit Salunke

38,800 शिक्षक-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

datta jadhav

भाजपला रोखण्यासाठी काॅंग्रेसचे मविआला समर्थन कायम-अशोक चव्हाण

Abhijeet Khandekar

गस्तीवरील सागर सुरक्षा रक्षकाला पर्ससीन नौकेने पळवल्याचा आरोप

Anuja Kudatarkar

…तर लोकं कधीही माफ करणार नाहीत ; लसीकरणावरून नाना पटोले यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

Archana Banage

कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar