Tarun Bharat

पतीचे अंत्यदर्शन मोबाईल व्हीडिओद्वारे

Advertisements

पतीचे मुंबईत निधन : शिमगोत्सवानिमित्त पत्नी आली आहे गावी

प्रतिनिधी / दोडामार्ग:

देशभरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निधन झालेल्या पतीचे अंत्यदर्शन मोबाईल व्हीडिओद्वारे करावे लागल्याची वेळ दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील विवाहितेवर ओढवली.

मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी दिलेली माहितीनुसार, मोर्ले येथील चंद्रकात लक्ष्मण बांदेकर (65) हे गावातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे. त्यांचे कुटुंब मुंबईत अंधेरी येथे असले, तरी गावात बऱयाचवेळा येणे-जाणे असायचे. शिमगोत्सवात त्यांनी पत्नीला दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले या गावी आणले होते. मोर्ले येथे रामनवमी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होतो. त्यामुळे चंद्रकांत हे रामनवमीला येणार होते. त्यांनी तिकिटही बूक केले होते. मात्र, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांनी येता आले नाही. गुरुवार, दि. 16 एप्रिल रोजी दुपारी त्यांचे ह्य्दयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले. मुंबई हे रेड झोनमध्ये येत असल्याने कुटुंबियांना त्यांच्यावरील अंत्यसंस्कार मुंबईतच करणे भाग पडले. शिवाय त्यांच्या पत्नीला मुंबईला नेणेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोक्याचे होते. अखेर कुटुंबियांनी चंद्रकांत यांच्या पत्नीला व्हीडिओद्वारे अंतिम दर्शन करविले. चंद्रकांत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बांदेकर यांचे मोर्ले गावातील नाटय़कलेसाठी बहुमोल योगदान होते. सामाजिक कार्यातील त्यांचा सहभागही मोठा होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त करण्यात आली.

Related Stories

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

Patil_p

केसरकरांनी जनतेला वाऱयावर सोडले!

NIKHIL_N

कोकणात अंडी घालायला येणाऱ्या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समिटर

Abhijeet Khandekar

निसर्ग वादळाचा संगमेश्वरलाही तडाखा

Patil_p

अपघातप्रकरणी 16 रेल्वे कर्मचाऱयांची होणार चौकशी?

Patil_p

गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनी आचरेत मधुरांजली

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!