Tarun Bharat

पतीसह पुनम होती पळायच्या तयारीत…

प्रतिनिधी/ काणकोण

चापोली लघुधरणावर अश्लिल व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने वादग्रस्त ठरलेली मॉडेल पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना सिकेरी-कळंगुट येथील एका तारांकित हॉटेलातून अटक करून गुरुवारी संध्याकाळी काणकोण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. कडक पोलीस बंदोबस्तात त्या दोघांना काणकोण पोलीस स्थानकावर आणले गेले.

उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क, निरीक्षक रवी देसाई, दीपक पेडणेकर, तेहरान डिकॉस्ता आणि पन्नासपेक्षा अधिक महिला व पुरुष पोलीस तैनात करण्यात आले होते. पूनम पांडे व सॅम बॉम्बे हे 6 रोजी दाबोळी विमानतळावर विमान पकडून पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलीस पथकाने दोघांना ताब्यात घेतले. काणकोणचे निरीक्षक डिकॉस्ता हे उपअधीक्षक आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. संशयितांनी काणकोणच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती आल्बुकर्क यांनी दिली.

सहायक अभियंत्यालाही निलंबित करा

काणकोणचे निरीक्षक तुकाराम चव्हाण, दोन पोलीस कर्मचारी आणि जलस्त्रोत खात्याचे दोन सुरक्षा रक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापूर्वी एकूण 7 सुरक्षा रक्षकांना बोलावून घेऊन त्यांच्या जबान्या घेण्यात आल्या. चापोली धरणाच्या टाकीची रंगरंगोटी करणे आणि चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करणे यासंदर्भात संशय असलेले साहाय्यक अभियंता अल्लाबक्ष यांनाही निलंबित करायला हवे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केलेली असून यासंबंधी खात्यांतर्गत चौकशी चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त

दरम्यान, या प्रकरणी संशय असलेल्या व्यक्तींना शासन व्हावे अशी मागणी करून काणकोणच्या जागरूक नागरिकांनी गुरुवारी काणकोण बंदचे आवाहन केल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानके आणि राखीव दलातील मिळून 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी काणकोणात तैनात करण्यात आले होते.

Related Stories

मडगावात तृणमूलची पकड मजबूत : फालेरो

Amit Kulkarni

जिल्हय़ात 2257 बाधित, 24 जणांचा मृत्यू

Patil_p

काणकोणात 25 रोजी ‘प्रशासन तुमच्या दारात’

Amit Kulkarni

…अन्यथा सरकार ‘त्या’ जमिनी ताब्यात घेणार

Omkar B

राज्यात नारळ विकास मंडळ स्थापणार

Omkar B

मडगावच्या घाऊक मासळी मार्केटसाठी अखेर आशेचा किरण

Amit Kulkarni