Tarun Bharat

पती जिवंत तरीही विधवेसमान जीवन

Advertisements

अजब परंपरेचे होतेय पालन

जगात असे अनेक देश आणि विविध समुदायाचे लोक आहेत, जे अजब वाटणाऱया कुठल्या न कुठल्या परंपरेचे पालन करत असतात. भारतातही अनेक प्रकारच्या धार्मिक परंपरा आणि प्रथा दिसून येतात. यातील काही परंपरा इतक्या विचित्र आहेत, की त्यांच्याबद्दल ऐकल्यावर आश्चर्य वाटते.

भारतात अनेक समुदायाचे लोक राहतात आणि सर्वांच्या रीति-रिवाज देखील वेगवेगळे आहेत. पण सर्व धर्म आणि समुदायांचे नियम आणि परंपरा बहुतांशकरून महिलांनाच मानाव्या लागतात. तर हिंदू धर्मात विवाहानंतर महिलांना कुंकू लावणे आवश्यक मानले जाते. कुंकू हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पण आमच्या देशात एक असा समुदाय आहे, जेथे पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी विधवेसारखे जीवन जगतात.

भारतात गछवाहा हा समुदाय असून त्याचे लोक अजब प्रकारच्या परंपरांचे पालन करतात. या समुदायाच्या महिला स्वतःच्या पतीच्या दीर्घायुसाठी दरवर्षी विधवेसारखे जगतात. या समुदायाच्या महिला पती जिवंत असतानाही वर्षातील सुमारे 5 महिन्यांसाठी विधवेसारख्या राहतात. या महिला दीर्घ काळापासून या अनोख्या परंपरेचे पालन करत आल्या आहेत.

या समुदायाचे लोक पूर्व उत्तरप्रदेशात राहतात. तर या समुदायाचे पुरुष वर्षातील 5 महिन्यांपर्यंत झाडांवरून ताडी उतरविण्याचे काम करतात. याचदरम्यान महिला विधवांसारखे जीवन जगतात. दरवर्षी पुरुष पाच महिन्यांपर्यंत झाडांवरून ताडी उतरविण्यास गेल्यावर महिलांनी कुंकू तसेच टिकली लावू नये, तसेच कुठल्याही प्रकारचा श्रृंगार करू नये अशी परंपरा आहे.

झाडावर चढून ताडी उतरविणे अत्यंत कठिण काम मानले जात नसल्याने महिला 5 महिन्यापर्यंत असे जगणे जगतात. ताडाचे झाड अत्यंत उंच आणि सरळ वाढलेले असते, यादरम्यान किंचित चूक झाली तरीही माणूस खाली कोसळून मरू शकतो. याचमुळे त्यांच्या पत्नी कुलदैवताकडे स्वतःच्या पतीच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करतात. गछवाहा समुदाय तरकुलहा देवीला स्वतःचे कुलदैवत मानतो. असे केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि 5 महिन्यांनी पती सकुशल परततो असे या समुदायाचे मानणे आहे.

Related Stories

चीनच्या आर्थिक हद्दपारीला प्रारंभ

Patil_p

संरक्षण अन् एअरोस्पेस क्षेत्रात संशोधनाला बळ

Patil_p

ट्विटरकडून राहुल गांधींवर कारवाई

Patil_p

देशात कोळशाचा पुरेसा साठा ः प्रल्हाद जोशी

Patil_p

योगी सरकारकडून शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांच्या कुटुंबियांना 50 लाख, एका व्यक्तीला नोकरी

Tousif Mujawar

LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; घरगुती गॅस सिलिंडरच्या…

datta jadhav
error: Content is protected !!