Tarun Bharat

पत्नीचा खून करुन तरुणाची गळफासाने आत्महत्या

मिरजोळे पडवेवाडी-कुवारबाव येथील घटना

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कौटुंबिक वादातून तरुणाने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करुन स्वतः  सिलिंग पॅनला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल़ा ही घटना शहरानजीकच्या मिरजोळे पडवेवाडी-कुवारबाव येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आल़ी या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आह़े रोहित राजेंद्र चव्हाण (29) व त्याची पत्नी पूजा (28, ओमविहार संकूल, पडवेवाडी मिरजोळे, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत..

   मंगळवारी सकाळी पूजाचा मृतदेह शयनगृहातील बिछान्यावर तर रोहितचा मृतदेह त्याच खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल़ा या घटनेची माहिती शेजारी विशाल सत्यवान चौगुले (22) यांनी शहर पोलिसांकडे दिल़ी

 सोमवारी रात्री रोहितने आपल्या मुलीला हॉलमध्ये झोपविले व स्वतः पत्नीसोबत शयनगृहात झोपला होत़ा मंगळवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुलीला बेडरुमचा दरवाजा बंद असल्याचे लक्षात आल़े मुलीने दरवाजा ठोठावून आई-वडिलांना हाक मारण्याचा प्रयत्न केल़ा मात्र आतून कोणताही प्रतिसाद तिला मिळाला नाह़ी यामुळे मुलीने शेजारी विशाल चौगुले यांना ही गोष्ट सांगितल़ी यानंतर हा प्रकार उघडकीस आल़ा

  शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाल़े पोलिसांकडून घटनेचा पंचमाना करण्यात आला. प्राथमिक तपासात रोहितने पत्नी पूजाचा खून करून स्वतः गळफास लावून घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आह़े पोलिसांनी दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व पूजा हे मुळ नाशिक येथील असून गेल्या काही वर्षापासून हे जोडपे आपल्या मुलीसह मिरजोळे पडवेवाडी येथे वास्तव्यास आहेत. पूजा ही मिरजोळे एमआयडीसीत औषध बनवणाऱया कंपनीत कामाला होत़ी रोहित मागील 6 महिन्यांपासून बेरोजगार होता. दरम्यान पूजा व रोहित यांच्यात कौटुंबिक कारणावरुन सातत्याने वाद होत असल्याचे सांगण्यात आले.

             चिठ्ठीमध्ये घटस्फोटाचा उल्लेख

रोहित याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आह़े यामध्ये त्याने घटस्फोटाचा उल्लेख केला आह़े यावरुन रोहित व पूजा यांच्यात कौटुंबिक वाद असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळत असली तरीही पत्नीला मारण्याचे व स्वतःचे आयुष्य संपविण्यामागील कारण त्याने लिहून ठेवलेले नसल्याचे  पुढे आले आहे.

Related Stories

राजापूरात दोन दिवसांमध्ये सापडले १० कोरोना रूग्ण

Archana Banage

कुडाळ प्रांताधिकारी सक्तीच्या रजेवर

NIKHIL_N

जिल्हाभर कडक लॉकडाऊन!

Patil_p

गणेशभक्तांचा यंदाही खड्डय़ांतूनच प्रवास!

Patil_p

कोकणात पाऊस आकडेवारीतही मुसळधार

Archana Banage

स्वत:च अभ्यासाचे तंत्र विकसित करा

NIKHIL_N