Tarun Bharat

पत्नीचे टेलिफोन संभाषण रेकॉर्ड करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन : हायकोर्ट

ऑनलाईन टिम / चंदिगढ

पत्नीच्या नकळत टेलिफोनवरील संभाषण रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन आहे, असे निरीक्षण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. भटिंडा कौटुंबिक न्यायालयाच्या 2020 च्या आदेशाला आव्हान देणाऱ्या एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती लिसा गिल यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

भटिंडा कौटुंबिक न्यायालयाने महिलेच्या विभक्त पतीला त्याच्या आणि त्याच्या पत्नीमधील रेकॉर्ड केलेल्या संभाषणांशी संबंधित सीडी सिद्ध करण्याची परवानगी दिली होती.“पत्नीच्या नकळत टेलिफोनिक संभाषण रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेचे स्पष्ट उल्लंघन आहे,” असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.

“याशिवाय, संभाषण कोणत्या परिस्थितीत झाले किंवा संभाषण रेकॉर्ड करणार्‍या एखाद्या व्यक्तीने कोणत्या पद्धतीने प्रतिसाद दिला हे सांगता येत नाही किंवा निश्चित केले जाऊ शकत नाही,त्यामुळे याचे कारण स्पष्ट आहे की ही संभाषणे गुप्तपणे रेकॉर्ड केली गेली असावीत,” असे पुढे निरीक्षण केले.

Related Stories

एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

Patil_p

नमाजासाठी ‘स्वतंत्र कक्षा’वरून राजकारण पेटले

Patil_p

उत्तराखंडमध्ये 23 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 1560

Tousif Mujawar

झारखंड, कर्नाटकात भूकंपाचे सौम्य धक्के

datta jadhav

सलग 17 व्या दिवशी इंधन दरवाढ

Patil_p

देशात कोरोनाचा विळखा होतोय घट्ट

datta jadhav