Tarun Bharat

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एका दिवसातच पतीचे निधन

बांदा/ प्रतिनिधी-

इन्सुली गावकरवाडी येथील सौ महानंदा महादेव गांवकर वय79 यांचे राहत्या घरी रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.तर मंगळवारी पहाटे त्यांचे पती निवृत्त शिक्षक श्री महादेव विठ्ठल गांवकर वय84 यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.पत्नीच्या निधनानंतर अवघ्या एका दिवसातच त्यांचे निधन झाल्याने गांवकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणे, पुतण्या, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. इन्सुली गावातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील जडणघडणीत गांवकर गुरुजी यांचा मोठा वाटा आहे.कै.विठ्ठल -रुक्मिणी गांवकर सामाजिक संस्था भाईदर चे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.विद्या विकास मंडळ इन्सुलीचे ते माजी खजिनदार होते.

Related Stories

कस्तुरीरंगन समितीच्या निर्णयावर डॉ. गाडगीळ नाराज

NIKHIL_N

आयटीआय प्रवेश प्रक्रियेबाबत आवाहन

NIKHIL_N

कर्नाटकातील दीड हजार मजूर स्वगृही रवाना

NIKHIL_N

कोलगाव कशेलवाडीत जाणारा रस्ता खचला

Anuja Kudatarkar

संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

Patil_p

आचऱ्यामधून चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

Anuja Kudatarkar