ऑनलाईन टीम / मुंबई :
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा याला पोलिसांनी अटक केली होती. त्याची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने त्याच्या विरोधात तक्रार केली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, करणला जामीन मिळाला आहे.


मिळालेल्या माहितनुसार, करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. त्यानंतर निशाने सोमवारी 31 मे रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. निशाने करणवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून करणला तातडीने ताब्यात घेेेऊन गोरेगाव पोलीस ठाण्यात त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला.


करण आणि निशा यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्याची बातमी याआधी अनेकवेळा समोर आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी निशाने करणशी कोणताही वाद नसल्याचे सांगत या सर्व बातमींना अफवा म्हटले होते.
दरम्यान, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेत करण मेहरा मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय करण ‘बिग बॉस 10’ आणि ‘नच बलिये 5’ मध्येही दिसला आहे. तर निशा सध्या ‘शादी मुबारक’ या मालिकेत दिसत आहे.