Tarun Bharat

पत्नीवर मित्रासमवेत बलात्कार करणार्‍या नराधमांना पोलिस कोठडी

प्रतिनिधी / शिरोळ

स्वतःच्या पत्नीबरोबर स्वतः व त्याचा मित्र असे दोघांनी मिळून मारहाण करून बलात्कार करणार्‍या नराधमांना जयसिंगपूर येथील न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

धरणगुत्ती ता. शिरोळ येथे पीडित महिला राहते. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी प्रदीप बाळासो पाटील ( वय 32) व त्याचा मित्र विकी उर्फ अनिल महादेव सुतार (वय 32) दोघे राहणार धरणगुत्ती या दोघांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन तिला अश्लील शिवीगाळ, मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. भयभीत झालेल्या या महिलेने सोमवारी रात्री यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रदीप पाटील याने दोन लग्नं केली आहेत. पीडित महिलेबरोबर त्याने प्रेमविवाह केला आहे. त्यास दारूचे व्यसन असून स्वतःच्या पत्नीबरोबर मित्रासोबत अत्याचार करणार्‍या या नराधमांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी या करीत आहेत.

Related Stories

‘थर्टी फस्ट’च्या पाटर्य़ांवर पोलिसांची नजर

Patil_p

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अटक

datta jadhav

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

datta jadhav

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण अपघात; तीन जण गंभीर जखमी

Abhijeet Khandekar

मानधन अप्राप्त सरपंच, उपसरपंचांनी त्वरीत ऑनलाईन नोंदणी करावी

Archana Banage

लाकूड तस्कर टोळीचा वनकर्मचाऱयांवर प्राणघातक हल्ला

Archana Banage