Tarun Bharat

पत्रकारांना दरमहा मानधन आणि विमा संरक्षण द्या – दिनकरराव पतंगे

वार्ताहर / सोन्याळ

लोकशाहीचा चौथा खांब असलेली पत्रकारिता हा समृध्द समाजाचा भक्कम आधार आहे शासन आणि जनतेमधील मुख्य दुवा असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागातील सर्वच पत्रकारांना दरमहा 3 हजार रुपये मानधन आणि आताच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबासाठी विशेष आर्थिक पॅकेजची तरतूद करण्याची मागणी कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव पतंगे यांनी केली आहे.

पत्रकार हा खांब राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु असतानाही जागृत पत्रकारिता करीत आहे. तसेच कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील जागृत नागरिकही करीत आहेत, केंद्र व महाराष्ट्र शासनाने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले पासुन पोलीस, डॉक्टर व त्यांचा स्टाफ, प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार, प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत. डाॅक्टर पोलीस, अथवा, शासकीय अधिकारी यांचे आर्थिक नियोजन विमा संरक्षण शासनाने यापूर्वी काढले आहे. परंतु त्या योजनेपासून पत्रकार वंचित आहेत.

पत्रकारांना अत्यंत तुटपुंजा पगार असतो ब-याचशा पत्रकारांचे आर्थिक नियोजन हे जाहीरातीचे कमिशनवर अवलंबुन आहे. सद्यस्थितीत जाहीराती बंद आहेत. अनेक पत्रकार आर्थिक अडचणीत आले आहेत. यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे पत्रकारांना खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो सर्वांचे अडीअडचणीत न्याय मिळवुन देणारे पत्रकारच अडचणीत आले आहेत. बातमीदारीसाठी त्यांना अनेक ठिकाणी फिरून बातमी गोळा करावी लागते यामुळे त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा धोका संभवतो. इतरांना जसे विमासंरक्षण आहे तसेच पत्रकारांनाही विमा संरक्षण मिळावे व या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाणे पत्रकारांनाही विशेष आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात यावे अशी मागणी दिनकरराव पतंगे यांनी केली आहे.

Related Stories

रेशन दुकानदारांची कमिशन वाढ विचाराधीन

Archana Banage

खूशखबर! महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत लागू

datta jadhav

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर जरूरी : प्रकाश जावडेकर

Tousif Mujawar

सातारा : जिल्ह्यात मृत्यूचे तांडव : सोमवारी सर्वोच्च 41 बळी

Archana Banage

रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाने नांद्रेतील शेतकऱ्यांवर अनेक संकटे

Archana Banage

सांगलीतील 30 हजार रूग्णांची कोरोनावर मात

Archana Banage