Tarun Bharat

पत्रकारांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Advertisements

तालुका, जिल्हा पातळीवर निवेदने सादर : विमा संरक्षणाची करून दिली आठवण

प्रतिनिधी / ओरोस:

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखाचे विमा संरक्षण देण्याचे जाहीर करूनही ते न देणाऱया शासनाविरोधात राज्यभरातील पत्रकार एकवटले आहेत. शुक्रवारी राज्यभरात काळे मास्क वापरून निदर्शने करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही जिल्हाधिकाऱयांना व तालुका पातळीवर प्रांत, तहसीलदारांना निवेदन देऊन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.

कोरोना कालावधीत पत्रकार आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे काम करीत आहेत. राज्यभरात आतापर्यंत या कालावधीत 25 पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्य मंत्र्यांनी बळी गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखांचे विमा संरक्षण देणार असल्याचे बुलढाणा जिल्हय़ातील एका सभेत जाहीर केले होते. मात्र अद्याप संबंधितांना कोणतीच मदत देण्यात आलेली नाही.

शासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात 18 रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक मराठी पत्रकार परिषदेने दिली होती. त्याचप्रमाणे अन्य संघटनांनीही याला दुजोरा दिला होता. त्यानुसार राज्यभर तहसीलदार व जिल्हाधिकाऱयांना निवेदने सादर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना एसएमएस पाठवून विरोध दर्शविण्यात आला. जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, सहसचिव दत्तप्रसाद वालावलकर, सदस्य मनोज वारंग, विनोद परब तसेच पत्रकार विनोद दळवी, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते. 

Related Stories

साटेली भेडशीतील दूरसंचार सेवा होणार सुरळीत

NIKHIL_N

दापोली-शिरशिंगेत परराज्यातील कामगाराचा खून

Patil_p

उद्योजक नामदेव मराठे यांचे निधन

NIKHIL_N

नियमाबाबत संभ्रमावस्थेने संचारबंदीचा विसर!

Patil_p

कारीवडेतील कोरोनाबाधित कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Anuja Kudatarkar

परप्रांतियांमधील साक्षर युवतीच्या पाठपुराव्याने महसूलकडून मदत

NIKHIL_N
error: Content is protected !!