Tarun Bharat

पत्रकाराकडून दर्पणकारांना अशीही आदरांजली….!

Advertisements

वार्ताहर / तळमावले

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयतीनिमित्त प्रतिवर्षी आपल्या कलेच्या माध्यमातून दर्पणकरांना अनोखी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न पत्रकार संदीप डाकवे हे करत आहेत. या वर्षी त्यांनी ठिपक्यातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चित्र रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली. यापूर्वी स्क्रिबलिंग, शब्द व लेखणीव्दारे, पोस्टर रेखाटून, रांगोळी इ.माध्यमातून दर्पणकारांची सुंदर चित्रे रेखाटून त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या या चित्रांची परिसरातील  लोकांकडून प्रशंसा होत आहे.  

 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संदीपने रंगरेषांचा, शब्दांचा आधार घेत कुंचल्यातून अनेक बोलकी चित्रे साकारली आहेत. दुर्गम, डोंगराळ व मुलभूत सोयीसुविधांचा अभाव असलेल्या वस्तीतील हा युवा चित्रकार व पत्रकार त्यापैकीच एक. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे व पत्रकार दिनाचे औचित्य साधून वेगळया शैलीतून तयार केलेले हे चित्र उल्लेखनीय स्वरुपाचे आहे. मान्यवरांकडून मिळालेल्या प्रोत्साहनाच्या व शाबासकीच्या थापेवर संदीपने आतापर्यंत विविध ठिकाणच्या पारितोषिके व पुरस्कांरावर आपले आपले नाव कोरले आहे.

खडूतून अष्टविनायकाची कलाकृती, मोर पिसावर संत तुकाराम, पिंपळाच्या जाळीदार पानावर श्रीगणेश, सर्वात मोठी भित्तीपत्रिका, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश लिहून व्यसनमुक्ती करण्याचा प्रयत्न, जटानिर्मूलन, पत्रमैत्री, रांगोळी, व्यंगचित्र रेखाटने यासारखे विविध समाजोपयोगी छंद जोपासले आहेत.

संदीप डाकवे याने आतापर्यंत राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर व सेलिब्रिटींची हुबेहुब चित्रे तयार करुन त्यांना भेट दिली आहेत. त्याच्या या गोष्टीची नोंद ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात झाली आहे. सातत्याने वेगळेपण जपत समाजप्रबोधन, जनजागृती यासाठी संदीपने आपल्या कलेचा उपयोग केला आहे.  त्याच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शासनाने दोनदा तर विविध मंडळे, सामाजिक संस्थांनी त्याला ‘दर्पण’, ‘पत्रकार भूषण’, ‘पत्रकार रत्न’,‘कलारत्न’, ‘कलाविभूषण’, ‘कलागौरव’, ‘पाटण भूषण’ अशा सुमारे 30 पुरस्कारांनी गौरवले आहे

महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, व्यसनमुक्ती, जटानिर्मुलन, ‘लेक वाचवा’, ‘स्वच्छ भारत अभियान’ ‘बचत गट’ अशा प्रकारच्या विषयातून जनजागृती व समाजप्रबोधन करण्यासाठी संदीपने आपलीे लेखणी समर्थपणे चालवली आहे. वडील राजाराम डाकवे व आई गयाबाई डाकवे हे त्याला सतत प्रोत्साहन देत असतात. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड. जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, जयंत कदम, सुरेश जाधव, सौ. रेश्मा डाकवे यांचे त्याला सतत मार्गदर्शन लाभते.

पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर पत्रकार संदीप डाकवे यांनी ठिपक्यातून रेखाटलेले चित्र परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. एका पत्रकाराकडून दर्पणकारांना दिलेली ही अनोखी आदरांजलीच म्हणावी लागेल.

Related Stories

50 रूग्णांची झाली ऍटीबॉडी टेस्ट

Patil_p

सातारा : शहीद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

datta jadhav

यंदा कास धरणात साठणार 300 दशलक्ष घनफूट पाणी

datta jadhav

कराडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेची वर्षपूर्ती

Amit Kulkarni

जिल्ह्यात 25 नवे बाधित

datta jadhav

वाघोशी येथे घरफोडी; सव्वा चार लाखाचा ऐवज लंपास

Amit Kulkarni
error: Content is protected !!