Tarun Bharat

पत्रकारिता नोकरी, व्यवसाय नसून ते सेवाव्रत : सुधीर कांदोळकर

प्रतिनिधी /पणजी

जगभरात होणाऱया अन्यायाला वाचा फोडणाऱया पत्रकारांवर होणारा अन्याय सहन करून ते आपले काम करीत असतात कारण पत्रकरिता ही नोकरी, व्यवसाय नसून ते एक सेवाव्रत आहे. समाजाच्या कल्याणासाठी झटण्याचे व्रत लोकमान्य टिळकांनी दिले त्याचा वारसा पुढे चालविण्याचे आवाहन म्हापसा नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केले.

अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या गोवा राज्य संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्याहस्ते पत्रकार औदुंबर शिंदे, रवी पाटील, किशोर नाईक, नितीन कोरगांवकर, ओमकार फळारी व पारस बेळगांवकर यांचा सन्मान करण्यात आला.

राजकारण्यांना पत्रकारांची गरज असते पण त्याहीपेक्षा अधिक समाजाला आहे व समाजाला वर काढायचे असेल तर एकजुटीने काम करायला हवे असे ते म्हणाले.

अखिल भारतीय ओबीसी महासभेच्या गोवा राज्य संघटनेचे अध्यक्ष शशिकांत घाडी यांनी पत्रकारांच्या जागृती करण्याच्या कामाची स्तुती केली. पत्रकारांनी निःपक्ष रहावे व अन्यायाला वाचा फोडावी असे सांगताना इतर मागासवर्गीय समाजावर होणाऱया अन्यायाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.

लोकसंख्येप्रमाणे राखीवतेची टक्केवारी वाढते. गोव्यात ओबीसीला 27 टक्के राखीवता आहे मात्र लोकसंख्या 50 टक्केपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सेंसर्स सर्वे हाती घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवर गजानन हळर्णकर व संतोष आखाडकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची धुरा पंकज नर्सेकर यांनी वाहिली. शेवटी त्यांनी आभार मानले.

Related Stories

डिचोली तालुक्मयात दोन तलाठी पॉझिटिव्ह

Patil_p

पद्मश्री विनायक खेडेकर यांचा राज्यपाल श्रीधरन यांच्याशी संवाद

Amit Kulkarni

सारमानस- टोक जल मार्गावरील चारचाकी वाहनचालकांत नाराजी

Amit Kulkarni

बोगदा गजानन मंदिराचा वर्धापनदिन व वार्षिक जत्रोत्सव

Amit Kulkarni

कोरोना महामारीमुळे नेत्रावळीतील ‘वर्षा पर्यटन’ ठप्प

Amit Kulkarni

सूर्याजी महात्मेंची ‘वेषधारी पंजाबी’ पुन्हा वाचकांच्या भेटीस…!

Omkar B