Tarun Bharat

पत्रकार आरोग्य तपासणीचा दुसरा टप्पा सांगलीत उत्साहात

प्रतिनिधी / सांगली

मराठी पत्रकार परिषद संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सर्व तालुका संघ यांच्या सहभागाने जिल्ह्यात ५०० पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीचा दुसरा टप्पा रविवारी यशस्वीरीत्या पार पडला.

जिल्हाभर १० तालुक्यात १५ ठिकाणी लिपिड प्रोफाईल ही तपासणी करण्यात आली. काही तालुक्यामध्ये हीच तपासणी येत्या दोन तीन दिवसात होणार आहे. गेल्या रविवारी सी बी सी, थायरॉईड आणि कॅन्सर मार्कर या तपासणी घेण्यात आल्या होत्या. त्यालाही मोठा प्रतिसाद लाभला. या ताणतणाव मुक्तीवर डॉ. दिलीप पटवर्धन यांचे व्याख्यान झाले. तणाव पातळी, मानसिक समस्या यावरही चाचणी करण्यात आली. शासनाच्या महा लॅब उपक्रमाच्या साहाय्याने जिल्ह्यातील १५ ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्रमुख गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे यातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तपासणी शिबिरे घेतली. येत्या काही काळात या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाचा आरोग्य विभाग आणि नामवंत डॉक्टर यांच्या साहाय्याने त्यावर पुढील मार्गदर्शन आणि उपचार केले जाणार आहेत, असे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील ज्या पत्रकार आणि वृत्तपत्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सहाय्याची गरज भासेल त्यांनी जिल्हा व तालुका पत्रकार संघाकडे संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Related Stories

सांगली : वाहतूक पोलिसांनीच मुजविले शिवाजी रस्त्यावरील खड्डे

Abhijeet Khandekar

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून तिघा दुचाकी चोरट्यांना अटक

Archana Banage

वांगी ग्रामपंचायतीस केंद्राचा ‘हा’ पुरस्कार जाहीर

Archana Banage

आता संभाव्य महापूराची माहिती देणार ‘कर्ण’

Archana Banage

मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्यावतीने खा. संभाजीराजेंना पाठिंबा

Abhijeet Khandekar

कर्ण मॅरेथॉन स्पर्धेचे ३० जानेवारीला आयोजन

Archana Banage