Tarun Bharat

पत्रकार दिनी सांगली जिल्हा पत्रकार संघातर्फे दुर्मिळ वृत्तपत्रांचे प्रदर्शन

प्रतिनिधी / सांगली

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बुधवार दि. 6 रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिवसभर वृत्तपत्रांच्या दुर्मिळ अंकांचे, व्यक्ती आणि संस्थांच्या गौरव ग्रंथांचे तसेच तारुण्यात देशासाठी फासावर चढलेल्या हुतात्म्यांचे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी दहा वाजता त्रिकोणी बागे जवळील वृत्तपत्र विक्रेता भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांचे मार्गदर्शन होणार आहे.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यासह राज्यभरातील विविध वृत्तपत्रांच्या जुन्या आणि दुर्मिळ अंकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील ही काही वृत्तपत्रांच्या अंकांचा समावेश आहे.

सांगलीतील वृत्तपत्र विक्रेते आणि साप्ताहिक भूमी भूषणचे संपादक मारुती नवलाई यांनी या अंकाचे संकलन आणि संग्रहण केलेले आहे. नवलाई यांच्याच संग्रहात असलेल्या सांगली जिल्ह्यातील मान्यवर संस्था आणि व्यक्तींच्या गौरव अंकांचे तसेच तारुण्यात इंग्रजानी फासावर चढविलेल्या देशातील अनेक हुतात्म्यांचे माहितीपूर्ण असे चित्र प्रदर्शन सुद्धा वृत्तपत्र विक्रेता भवन येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पहायला उपलब्ध असणार आहे.

सर्व पत्रकारांसहित शहरातील सुज्ञ नागरिक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंनीही पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून प्रदर्शनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन अविनाश कोळी आणि जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Stories

शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यासाठी दबावगटाची गरज : राजू शेट्टी

Patil_p

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

datta jadhav

सिद्धगिरी कोविड हॉस्पिटलचा तिसरा विस्तारित विभाग लोकार्पण सोहळा संपन्न

Archana Banage

कचरा गाडीचे टेंडर नेमके कोणाला जाणार ?

Patil_p

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात दोघे पॉझिटिव्ह तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Archana Banage

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी चालवला ट्रॅक्टर

Archana Banage