Tarun Bharat

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

नवी दिल्ली-

वरिष्ठ पत्रकार आणि हिंदी न्यूज चॅनेल आज तकचे वरिष्ठ अँकर रोहित सरदाना यांचे शुक्रवार, 30 एप्रिल रोजी निधन झाले. कोरोना संसर्गातून सावरल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्मयाने त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सरदाना हे टीव्हीवरील किंवा न्यूज चॅनेलवरील प्रचलित चेहरा होते. वृत्तवाहिन्यांमधील आघाडीचे पत्रकार आणि अँकर अशी त्यांची ओळख होती. रोहित सरदाना हे 2017 मध्ये ‘आज तक’मध्ये रुजू झाले होते. त्याआधी ते झी न्यूजमध्ये कार्यरत होते. आज तक या हिंदी न्यूज चॅनेलवर ते ‘दंगल’ या एका डिबेट शोचे अँकर होते. रोहित सरदाना यांना 2018 मध्ये गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Related Stories

भारत-रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर उतरलेली

Patil_p

सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्याने कुटुंबातील आणखी एकाचे निधन

Tousif Mujawar

सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर लष्करी महिला अधिकाऱ्यांना न्याय

Patil_p

पंजाबमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू, 82 नवे रुग्ण 

Tousif Mujawar

विशाखापट्टणममध्ये तीनमजली इमारत कोसळली, 3 जणांचा मृत्यू

Amit Kulkarni

सीबीआय प्रमुख कालावधीवाढ विधेयक संमत

Patil_p