Tarun Bharat

पत्रादेवीत दहा लाखांची चोरटी दारु जप्त

प्रतिनिधी/ पेडणे

पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्गावरील चेकनाके खुले केल्यानंतर आता पत्रादेवीमार्गे चोरटी दारु वाहतूक करणारे चोरटे सक्रिय झाले आहेत. पेडणे अबकारी कार्यालयाने पञादेवी येथील तपासणी नाक्मयावर काल रविवारी सुमारे 10 लाख रुपयांच्या किंमतीची दारु व वाहन जप्त केले आहे. पेडणे अबकारी कार्यालय प्रमुख अधिकारी सुरेखा गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 नौदल विभागाचे बनावट पत्र घेऊन एक टेम्पो एमएच 04 जेयू – 2243 पत्रादेवीमार्गे पुणे जायला निघाला होता. पत्रादेवी चेक नाक्मयावर तो पोहोचताच अबकारी अधिकाऱयांना संशय आल्याने त्यांनी त्याला अडवून तपासणी केली असता त्यात दहा लाखापेक्षा जास्त किमतीची बियर, रम दारुच्या बाटल्यांचे बॉक्सेस सापडले. संतापाची बाब म्हणजे अधिकारी टेम्पोची तपासणी करत असतानाच वाहनचालकाने वाहन तिथेच ठेवून पळ काढला. नंतर अबकारी अधिकाऱयांनी सर्व दारु तसेच वाहन जप्त केले.

 पेडणे अबकारी अधिकारी मोहनदास गावकर, शांबा परब, सिद्धेश हरमलकर, रेमंड परेरा, स्वप्नेश नाईक व सुरज गावडे आदींनी ही कारवाई केली.

 कोणत्याही पासणीशिवाय वाहन सोडून द्यावे?

  टेम्पो चेकनाक्यावर थांबविला असता चालकाने नाक्मयावरील अधिकाऱयांना सांगितले की टेम्पोमध्ये नौदलाचे सामान असून ते पुण्याला नेतो आहे. मात्र यावेळी त्याने आपल्याकडील नौदलाचे जे पत्र अधिकाऱयांना दाखविले ते बनावट होते. त्यात लिहिले होते की संरक्षण मंत्रालयाच्या नौदल विभागाचे महत्वाचे सामान असून कोणत्याच चेकनाक्मयावर अडथळा न करता हे वाहन विनाविलंब प्राधान्यक्रमाने सोडावे. कोणताच अडथळा न आणता ते तपासणीशिवाय सोडून द्यावे. या वाहनाची व सामानाची सर्व कागदपत्रे आमच्या कस्टडीत आहेत. समान पोचल्यावर वाहनचालकाकडे सुपूर्द केली जाणार आहेत, असा उल्लेखही त्या पत्रात करण्यात आला होता.

 चालकाने वाहन तेथेच सोडून काढला पळ

 अबकारी विभागाच्या अधिकाऱयांना त्या पत्राबाबत संशय आला. वाहनचालकाला मागून वाहन उघडे कर, सामान तपासतो असे अधिकाऱयांनी सांगितले असता वाहनचालक म्हणाला तपासू नका. तुम्हाला तपासायला मिळणार नाही, म्हणून तुम्हाला हे पत्र सादर केले आहे. अधिकाऱयांनाही त्याचा अधिकच संशय आला. वाहन तपासणी करण्यासाठी अधिकारी गेले त्यावेळी संधी साधून वाहनचालकाने वाहन तेथेच सोडून तेथून पळ काढला. तपासणीनंतर स्पष्ट झाले की त्यामध्ये दहा लाखांची चोरटी दारु होती.

Related Stories

मुसळधार पावसाने राज्याला झोडपले

Omkar B

मुरगावच्या महिलांना राखीवता लाभल्याने संकल्प आमोणकर व कार्यकर्त्यांमध्ये समाधान

Amit Kulkarni

उत्तर गोव्यात वाढतेय आपची ताकद

Amit Kulkarni

बुद्धिबळ स्पर्धेत हरमल पंचक्रोशी हायस्कूलला जेतेपद

Amit Kulkarni

पणजीत उद्यापासून पुरुमेताचे फेस्त

Omkar B

डॉ. विशाल च्यारी गुढरित्या बेपत्ता कार मुळस-पारोडा येथे सापडली

Omkar B