Tarun Bharat

पदक निश्चित! रवीकुमार दहियाचा अंतिम फेरीत प्रवेश

ऑनलाईन टीम / टोकियो :

भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल रवीकुमार दहिया याने कझाकिस्तानच्या मल्लाला चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचे ऑलिम्पिकमधील चौथे पदक निश्चित झाले आहे.

फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये 57 किलो वजनी गटात रवीकुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव केला. सुरुवातीला 5-9 अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं जोरदार कमबॅक करत तीन गुण कमावले आणि झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला. 2012 नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे.

Related Stories

सचिनचा कोरोनाविरुद्ध मास्टरस्ट्रोक

Patil_p

रंकाळा टॉवर पुन्हा दहशतीखाली…

Archana Banage

भारत-चीन सीमेवर BRO चे 18 मजूर बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला

datta jadhav

तेरणी येथे युवकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

ऑस्ट्रेलियाचा विंडीजवर वनडे मालिका विजय

Patil_p

चारधाम यात्रेवरील बंदी उठवली

datta jadhav