Tarun Bharat

पदपथ, रस्त्यावरील बेकायदा विक्रेत्यांवर कारवाई करा

गांधी मार्केट व न्यू मार्केट संघटनेची मागणी, अन्यथा आम्हीही उद्यापासून रस्त्यावर व्यवसाय थाटू : शिरोडकर

प्रतिनिधी / मडगाव

कर्फ्यू काळात बेकायदा विपेते रस्ते व पदपथांवर अतिक्रमण करून व्यवसाय करत असल्याने आणि मडगाव पोलीस व पालिकेकडून कारवाई होत नसल्याने गांधी मार्केट व न्यू मार्केट व्यापारी संघटनांनी संताप व्यक्त केला असून आज बुधवारी या बेकायदा विपेत्यांवर संबंधितांकडून कारवाई न झाल्यास आम्ही गुरुवारपासून रस्त्यावर व पदपथांवर व्यवसाय थाटणार असल्याचा इशारा न्यू मार्केट टेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी, पालिका आणि पोलिसांनी शहरातील मुख्य बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. मग पदपथ व रस्ते अडवून बेकायदा विपेते करत असलेल्या व्यवसायावर पोलीस व पालिकेकडून का कारवाई होत नाही, असा सवाल त्यांनी केला. पावसाळी साहित्य त्यात प्लास्टिक आवरणे, छत्र्या, रेनकोट यांची बेकायदा विपेते विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठा खोलल्या, तर कोविडचा फैलाव होतो व सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱया बेकायदा विपेत्यांमुळे कोविड फैलावत नाही काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्ही येत्या सोमवारी दुकाने खोलणार होतो. परंतु मार्केट परिसराला भिडून असलेल्या पिंपळकट्टा, रोपाआळ, लीली गार्मेन्ट या भागात रस्ते, पदपथ अडवून एसओपी धुडकावून बिनधास्तपणे मागील आठवडाभर व्यवसाय सुरू आहे. पोलिसांना कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांनी मोकळीक दिली आहे, तरी कारवाई होत नाही. पालिकेकडून या प्रकारांकडे कानाडोळा केला जातो. दोन्ही अधिकारिणींकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे याबद्दल शिरोडकर यांनी संताप व्यक्त केला.

अन्यथा उद्यापासून बाजारपेठ उघडू द्यावी

आपण मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्याशी यासंदर्भात बोललो असून हे प्रकार आज बुधवारी चालू राहिले, तर गुरुवारी आम्ही रस्त्यावर उतरणार व व्यवसाय करणार, असे शिरोडकर यांनी सांगितले. अन्यथा आम्हाला गुरुवारपासून बाजारपेठ खोलून द्यावी असा पवित्रा न्यू मार्केट व्यापाऱयांनी घेतला आहे. जिल्हाधिकाऱयांनी यात लक्ष घालून आवश्यक कृती करण्याची मागणी व्यापाऱयांनी उचलून धरली आहे.

जिल्हाधिकाऱयांनी निर्देश द्यावेत : आजगावकर

गांधी मार्केट संघटनेचे नेते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर यांनी गांधी मार्केटमधील व्यापारी आपल्याकडे शहरी भागात भरणाऱया बेकायदा व्यवसायाबद्दल कैफियती मांडत असून मार्केट बंद ठेवून पालिका व पोलीस या विपेत्यांवर का कारवाई करत नाही असा सवाल करत असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकाऱयांनी पोलीस व पालिकेला बेकायदा रस्ते, पदपथांवर व्यवसाय करणाऱयांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत. अन्यथा गांधी मार्केटमधील दुकानदारांनी दुकाने खोलली, तर आम्ही काही करू शकणार नसल्याचे आजगावकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात सध्या कर्फ्यू लागू असून सकाळच्या सत्रात फक्त जीवनाश्यक वस्तूंची विक्री करण्यास सूट असली, तरी मडगावात सोमवारी व मंगळवारी सकाळी प्लास्टिक आवरणांची विक्री करणाऱयांनी बेकायदा दुकाने थाटली व येथे खरेदीसाठी गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मडगाव पोलीस व पालिका अधिकाऱयांनी या बेकायदा दुकानांवर कारवाई न केल्याने पोलीस व पालिका मडगावात कोविड संसर्ग फोफावण्यास हातभार लावत असल्याची टीका मडगाववासियांकडून होत आहे.

Related Stories

स्व.मनोहर पर्रीकर यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

Amit Kulkarni

राज्यातील महाविद्यालये एक सप्टेंबरपासून सुरु

Omkar B

सत्तरीत वादळी वाऱयाचा वीज खात्याला फटका

Amit Kulkarni

हरमल येथील भजनी सप्ताह आजपासून

Amit Kulkarni

श्रावणमासानिमित होंडा आजोबा कळसापेड देवस्थानात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

Amit Kulkarni

वडाकडे-उसगांव रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक

Amit Kulkarni