Tarun Bharat

पदवीधरांच्या प्रश्नासाठी भाजपाचे उमेदवार एकजुटीने काम करतील

  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील याची ग्वाही

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे पदवीधरची जागा केवळ एक अपवाद वगळता परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाची राहिली आहे. गेल्या 12 वर्षात पदवीधरांच्या विषयात बरेच काही केले. आगामी काळातही पदवीधरांचे प्रश्र्न सोडवण्यासाठी भाजपाचे उमेदवार काम करतील, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचे संग्राम देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, रणजित पाटील, सिद्धार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहर संघटन मंत्री राजेश पांडे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे पदवीधरची जागा परंपरेनुसार भारतीय जनता पक्षाचीच राहिली आहे. गेली 12 वर्षे मी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. या काळात पदवीधरांचे अनेक प्रश्र्न सोडवले. यात प्रामुख्याने यूपीएससी आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी राज्य स्तरावर मार्गदर्शन केंद्र सुरू करावेत, यासाठी पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावला. मी स्वत: कोल्हापूरमध्ये विद्याप्रबोधिनी नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले. त्याचबरोबर पदवीधर मतदार याद्यांचा जो घोळ सातत्याने व्हायचा, त्यासाठी दिल्लीत जाऊन या विषयाची सोडवणूक केली.  


ते पुढे म्हणाले की, संग्राम देशमुख यांच्यासह भाजपाचे तीन पदवीधर उमेदवार आणि अमरावतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार हे सर्वजण शिक्षकांच्या आणि पदवीधरांचे प्रश्न मांडतील. तसेच आगामी काळात आरक्षणातील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना रोजगार भत्ता सुरू करणे, अंतरवासिता कायदा (ॲप्रन्टिसशीप ॲक्ट) मध्ये सुधारणा करून घेणं आदी विषयावर भारतीय जनता पक्षाचे आमदार सर्वांना सोबत घेऊन काम करतील.

Related Stories

सरपंचांना दोन मतांचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

Abhijeet Khandekar

सातारा : वडूज – मायणी पोलिसांची अवैध दारू, जुगार अड्डयावर कारवाई, १७ जणांवर गुन्हा दाखल

Archana Banage

सोलापूर : प्रियसीच्या ञासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

Archana Banage

वाढीव वीज बिल कमी करा

Archana Banage

शिरोळ तालुक्यावर महापुरानंतर आता कोरोनाचे संकट…!

Archana Banage

पुणेकरांची मिळकत करातील ४० टक्के सवलत कायम ठेवावी

datta jadhav