Tarun Bharat

पदवीधर मतदारांना उमेदवारांनी आणले जेरीस

उमेदवारांची संख्या जास्त असल्याने उडतोय मतदारांचा गोंधळ

प्रतिनिधी/ सातारा

पुणे पदवीधर आणि शिक्षकची निवडणूकीचे मतदान दि.1रोजी होत आहे.मतदानाला केवळ चारच दिवस उरले असून उमेदवारांची संख्या जास्त असल्याने 58 तालुक्यातील मतदारांवर मेसेज, फोन कॉल यांचा पुरता भडिमार सुरू आहे.त्यामुळे मतदारच पुरता गोंधळून गेला असून काही मतदारांनी फोन बंद ठेवणे पसंद केले आहे.

या पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत रंगत आली आहे.प्रचारासाठी फारच कमी दिवस उरले आहेत.नेते, कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून पळत आहेत. कोरोना वाढत असला तरीही आपलाच उमेदवार आमदार झाला पाहिजे यासाठी खटपट सुरू आहे.58 तालुक्यातील मतदारापर्यंत पोहचण तसे अवघड आहे. मग सोपी आयडिया म्हणून या सर्व मतदारांचे फोन नंबर घेऊन उमेदवारांच्या कॅपेनियनकडून मेसेज आणि फोन कॉलचा भडिमार सुरू आहे.आमच्या उमेदवाराला एक नंबरचे मत द्या असे हमरिंग केले जात आहे.त्यामुळे उमेदवारांना मतदान का करायचं असा प्रश्न मतदारांना पडू लागला आहे.

Related Stories

Satara : दिशा समितीच्या बैठकीत सदस्यांनाच केल्या खास. श्रीनिवास पाटील यांनी सूचना

Abhijeet Khandekar

जम्बो हॉस्पिटलची जय्यत तयारी सुरू

Patil_p

पालिकेत बिलाचा गडबड घोटाळा

Patil_p

पाटणला मोर्चावेळी आंदोलक-पोलिसांची झटापट

Patil_p

किरकोळ कारणावरून दोन जणांना लाकडी दांडक्याने मारहाण

Archana Banage

श्री केमिकल्सने जोपासली सामाजिक बांधिलकी

Patil_p