Tarun Bharat

‘पदवीपूर्व’चे कार्यालय 4 मार्चपासून जेल शाळा आवारात

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

गोंधळी गल्लीतील पदवीपूर्व शिक्षणाधिकाऱयांचे कार्यालय 4 मार्चपासून वडगाव येथील जेल शाळा आवारात कार्यरत राहणार आहे. खात्याचे सदर कार्यालय भाडोत्री इमारतीत होते. त्यामुळे आर्थिक फटका टाळण्यासाठी कार्यालयाच्या स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.

कित्येक वर्षांपासून पदवीपूर्व शिक्षणाधिकाऱयांचे कार्यालय गोंधळी गल्लीतील खासगी इमारतीत सुरू होते. परिणामी खात्याला आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत होते. खात्याने नुकताच याबाबत निर्णय घेऊन राज्यातील सर्व पदवीपूर्व शिक्षणाधिकाऱयांची कार्यालये सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयांत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. बेळगाव येथील गोंधळी गल्लीतील कार्यालय वडगाव येथील जेल शाळेच्या आवारातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर हलविण्यात येत आहे.

महाविद्यालयाच्या नूतन इमारतीत कार्यालयाचे निम्म्याहून अधिक साहित्य हलविण्यात आले आहे. गुरुवारच्या शुभमुहूर्तावर पूजाअर्चा करून कामकाजास तात्पुरती सुरुवात करण्यात आली असून जुन्या कार्यालयात केवळ आवक (इनवर्ड) विभाग सुरू आहे. 4 मार्चपूर्वी तो विभागही नव्या कार्यालयात स्थलांतरित केल्यानंतर कार्यालयाचे संपूर्ण कामकाज तेथूनच चालेल, असे पदवीपूर्व शिक्षणाधिकारी नागराज हुगी यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.

कार्यालय स्थलांतरित केल्याने पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राध्यापक तसेच पालकांची गैरसोय होण्याची शक्मयता आहे.

पदवीपूर्व महाविद्यालयात पुरेशी जागा उपलब्ध

नागराज हुगी (पदवीपूर्व शिक्षणाधिकारी)

खरेतर हे कार्यालय सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव होता. प्राध्यापक आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी वडगाव येथील जेल शाळेत कार्यालय स्थलांतरित केले जात आहे. जेल शाळा आवारातील पदवीपूर्व महाविद्यालयात पुरेशी जागा उपलब्ध असून कार्यालयासाठी दोन खोल्या देण्यात आल्या आहेत.

Related Stories

माधवबाग कॉलेज रोड क्लिनिकला पुरस्कार

Amit Kulkarni

बन्नंजे राजासह आठजणांना जन्मठेप

Rohan_P

जिल्हय़ात मंगळवारी 38 नवे रुग्ण

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकात अनेक समस्या

Patil_p

महापालिका निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Patil_p

वायव्य परिवहन महामंडळाच्या महसुलात वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!