Tarun Bharat

पदवीपूर्व कॉलेजला यापुढे गणवेशसक्ती

पदवीपूर्व शिक्षण विभागाचा निर्णय : विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच गणवेशाची माहिती दिली जाणार

प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटकात मागील काही दिवसात हिजाब प्रकरणावरून मोठा वादंग माजला होता. यामुळे बरेच दिवस माध्यमिक शाळावर्ग व महाविद्यालये बंद ठेवावी लागली होती. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाने 2022-23 या  शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व विद्यार्थ्यांना गणवेश (युनिफॉर्म) सक्तीचा केला आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच गणवेशाची माहिती दिली जाणार आहे.

पदवीपूर्व शिक्षण विभागाने सोमवारी 2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासंदर्भात मार्गसूची जाहीर केली. या मार्गसूचीनुसार पहिल्या व दुसऱया पदवीपूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती करण्यात आली आहे. संबंधित कॉलेजने ठरविलेला गणवेश विद्यार्थ्यांना परिधान करावा लागणार आहे. हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे.

बऱयाच पदवीपूर्व कॉलेजमध्ये यापूर्वीच डेसकोड करण्यात आला आहे. परंतु अद्याप काही कॉलेजमध्ये डेसकोड नसल्याची बाब समोर आली होती. डेसकोडमुळे वादाचे प्रसंग टाळता येणार आहेत. प्रत्येक कॉलेजला याबाबत सूचना करण्यात आली असून, ज्या कॉलेजमध्ये डेसकोड नाही त्यांना डेसकोड करण्याच्या सूचना पदवीपूर्व शिक्षण विभागाने केल्या आहेत.

उद्यापासून अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात होणार

दहावीचा निकाल गुरुवार दि. 19 रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे दुसऱयाच दिवसापासून पीयूसी प्रथम वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात होणार आहे. 20 मेपासून कॉलेजने प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 9 जूनपासून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. 15 जूनपर्यंत दंडात्मक शुल्काशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. 9 जून ते 30 सप्टेंबर या दरम्यान पहिले सेमिस्टर तर 13
ऑक्टोबर ते 31 मार्च या दरम्यान दुसरे सेमिस्टर घेतले जाणार आहे.

Related Stories

कोरोना परिस्थितीः केंद्रीय पथकाने मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची घेतली भेट

Archana Banage

बेळगावमध्ये उभारले जातेय ‘हायटेक रेल्वेस्थानक’

Patil_p

शास्त्रीनगर येथील वृध्दाचा कोरोनामुळे मृत्यू

Tousif Mujawar

अथणी तालुक्यातील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Patil_p

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांचा दणका

Amit Kulkarni

जिजाऊ महिला मंडळाचा वर्धापन दिन उत्साहात

Amit Kulkarni