Tarun Bharat

पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

नेटवर्क अभावी 26 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय
ढगाळ वातावरणाचा फटका
27 पासून सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षेला प्रारंभ

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा आज (दि. 21) रोजी सुरू होणार होत्या. परंतू ढगाळ वातावरणामुळे विद्युत पुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. तसेच महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने 26 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 27 पासून सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठातील पदवी अंतिम सत्राच्या परीक्षेला 74 हजार विद्यार्थ्यी बसणार आहेत. यापैकी 52 हजार विद्यार्थी ऑनलाईन तर 22 हजार विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देणार आहेत. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने ऑनलाईन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळात नव्हते.

शिक्षकांना प्रश्नपत्रिका अपलोड करण्यासाठी अडचणी आल्या. विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी दिवसभर सॉफ्टवेअर कंपनी, पेपर सेटर आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींचा आढावा घेतला. तसेच हवामानखात्यानेही अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पाऊस आल्यास काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होवू शकतो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, या सर्व अडचणी लक्षात घेवून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकाव्दारे परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना एसएमएसव्दारे कळवली माहिती

विद्यापीठातील पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा 26 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहेत. तर 27 ऑक्टोबरपासून सर्व परीक्षा सुरू होणार आहेत. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाकडून एसएमएसव्दारे विद्यार्थ्यांना कळवण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठातील पदवी अंतिम सत्राच्या परीक्षा उद्या 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. ही परीक्षा 74 हजार विद्यार्थी देणार आहेत. यापैकी ऑनलाईन परीक्षा 52 हजार विद्यार्थी तर ऑफलाईन परीक्षा 22 हजार विद्यार्थी देणार आहेत. या परीक्षेच्या तयारीचा अंतिम टप्पा सुरू असून, सॉफ्टवेअरमध्ये प्रश्नपत्रिका समाविष्ट करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी दिली.

पदवी अंतिम सत्राच्या जवळपास 200 हून अधिक विषयाच्या परीक्षा बुधवार 21 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी बसणाऱया विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून ई-मेल व एसएमएसव्दारे परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड पाठवण्यात आले आहेत. ऑफलाईन परीक्षेसाठी संलग्नित महाविद्यालयांना ई-मोडव्दारे प्रश्नपत्रिका पाठवण्यासाठी संगणक प्राणाली तयार करण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयांना परीक्षा केंद्रे सॅनिटायझर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा विभागाच्या वतीने विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील जवळपास 1हजार प्राध्यापकांना परीक्षेसंदर्भात ऑनलाईन प्रात्यक्षिके दाखवून प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच परीक्षा विभागात सोमवारी उशिरापर्यंत परीक्षेसंदर्भातील कामाची कामे सुरू होती.

Related Stories

महिला बचत गटाच्या माध्यमातून बांधावर खते व बियाणे वाटप

Archana Banage

‘तुमचा भुजबळ करू’ म्हणणाऱ्यांना कोर्टाने उत्तर दिलं : मंत्री भुजबळ

Archana Banage

कोरोनाच्या संभाव्य तिस्रया लाटेत मुलं बाधित होण्याचा अंदाज

Patil_p

कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन सोमवारपासून शिथील

Archana Banage

प्रीतिसंगमावर पोहण्यास गेलेल्या व्यक्तीवर मगरीचा हल्ला

Archana Banage

शिवाजी विद्यापीठ देणार प्रवेश शुल्कात 20 टक्के सवलत

Archana Banage