Tarun Bharat

पदार्पणवीर नामिबियाचा स्कॉटलंडविरुद्ध लक्षवेधी विजय

Advertisements

नामिबियाचा स्पर्धेतील पहिला विजय, रुबेल टम्पेलमनचे पहिल्याच षटकात 3 बळी

अबु धाबी / वृत्तसंस्था

पदार्पणवीर नामिबियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील लो-स्कोअरिंग लढतीत स्कॉटलंडविरुद्ध 4 गडी राखून लक्षवेधी विजय संपादन केला. आयर्लंड व नेदरलँड्सला नमवून सुपर-12 फेरीसाठी पात्रता संपादन केलेल्या नामिबियाने स्कॉटलंडला 8 बाद 109 धावांवर रोखले आणि प्रत्युत्तरात 19.1 षटकात 6 गडय़ांच्या बदल्यात 115 धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.

डावखुरा मध्यमगती गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमनने पहिल्याच षटकात चक्क 3 फलंदाज बाद करत जोरदार धक्के दिले आणि स्कॉटलंडचा संघ यातून शेवटपर्यंत सावरु शकला नाही. वास्तविक, नामिबियाने सहज विजय संपादन करणे कठीण नव्हते. पण, स्कॉटिश फिरकी त्रिकुट ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट व मायकल लेस्क यांनी नामिबियाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात उत्तम यश संपादन केले. डेव्हिड व्हिएझने (15 चेंडूत 16) फटकेबाजी केल्यानंतर जेजे स्मिथने (23 चेंडूत नाबाद 32) नामिबियातर्फे विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

Related Stories

पाकचा झिंबाब्वेवर मालिका विजय

Patil_p

जडेजाच्या सलग 2 षटकारांमुळे चेन्नईची बाजी!

Patil_p

सिंधूचे लक्ष आता वर्ल्ड चॅम्पियनशिपवर

Patil_p

उत्तराखंड बाद फेरीमध्ये दाखल

Patil_p

यू-16 एएफसी चॅम्पियनशिपचा आज ड्रॉ

Patil_p

जेव्हा संतप्त युनूसने ग्रँट फ्लॉवरच्या मानेवर सुरी धरली!

Patil_p
error: Content is protected !!