Tarun Bharat

पदार्पणवीर रॉबिन्सन अवघ्या 5 दिवसात निलंबित!

लंडन / वृत्तसंस्था

:

इंग्लंडचा जलद गोलंदाज ऑलि रॉबिन्सनला सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबित केले गेले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या 5 दिवसात त्याच्यावर ही नामुष्की आली. रॉबिन्सनने 2012-13 मध्ये काही वादग्रस्त वर्णद्वेषी ट्वीट केले होते. त्या ट्वीटची चौकशी सुरु असून या पार्श्वभूमीवर रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निलंबित करण्याचा निर्णय इंग्लिश बोर्डाने घेतला.

‘रॉबिन्सन तातडीने इंग्लिश पथकातून कौंटी संघाकडे रवाना होत आहे. तो पुढील सामन्यासाठी इंग्लिश संघात उपलब्ध असणार नाही’, असे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने यावेळी नमूद केले. कौंटी क्रिकेटमध्ये ऑलि रॉबिन्सन ससेक्स संघाचे प्रतिनिधीत्व करतो.

सध्या इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका सुरु असून या मालिकेत लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑलि रॉबिन्सनने आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण नोंदवले. मात्र, या लढतीतील पहिल्याच दिवशी रॉबिन्सनचे 2012-13 मधील काही वादग्रस्त ट्वीट व्हायरल झाले. वास्तविक, रॉबिन्सनने सामना संपल्यानंतर त्या दिवशी यावर जाहीर माफीही मागितली. मात्र, सदर ट्वीटवरुन चाहत्यांमध्ये रोष वाढतच राहिला आणि इंग्लिश बोर्डाने याची गंभीर दखल घेतली.

रॉबिन्सनने वयाच्या 18 व 19 व्या वर्षी सदर आक्षेपार्ह वर्णद्वेषी ट्वीट केले होते. त्यावेळी या ट्वीटवर फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. मात्र, लॉर्ड्सवर या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याच दिवशी हे ट्वीट्स व्हायरल झाले व यानंतर तो वादाच्या भोवऱयात सापडला. रॉबिन्सनने लॉर्ड्सवरील आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील दुसऱया डावात 7 बळी घेतले. शिवाय, पहिल्या डावात फलंदाजीतही कमाल दाखवताना 42 धावांचे योगदान दिले होते.

Related Stories

दक्षिण-पश्चिम विभागात अंतिम लढत

Patil_p

भारतीय बुद्धिबळपटूला मेलबर्न विमानतळावर रोखले

Patil_p

भारत-पाकिस्तान उपांत्य लढत आज

Patil_p

चेसेबल मास्टर्स स्पर्धेत आर. प्रज्ञानंद उपविजेता

Patil_p

खेडवासिय ठरले खऱया अर्थाने ‘कोरोना वॉरियर्स’

Patil_p

ब्रॅडबर्न, सकलेन मुश्ताक यांच्यावर नवी जबाबदारी

Patil_p