Tarun Bharat

पद्म पुरस्कार विजेत्याचा मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एका पद्म पुरस्कार विजेत्याने दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना आसाममध्ये घडली आहे. पीडित मुलीवर वर्षभरापासून बलात्कार केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर आसाम पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आरोपीने गुवाहाटी उच्च न्यायालयात धाव घेतली. २८ डिसेंबरला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. पण, हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे, असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आरोपीच्या प्रतिष्ठेला मलिन करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा आरोपीने याचिकेत केला आहे. तसेच बाल कल्याण समितीविरोधात देखील याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच एपआयआरमध्ये पीडितेचे कोणतेही विशेष वक्तव्य नाही. त्यामुळे न्याय हितासाठी अंतरिम आदेश दिले जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं. तसेच याचिकाकर्त्याला ७ दिवसांत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत.

Related Stories

कोल्हापुरात संजय पवार की धनंजय महाडिक? शौमिका महाडिक म्हणाल्या, मनात घालमेल,भिती पण…

Abhijeet Khandekar

दिल्ली सरकार येत्या एक महिन्यात 44 ऑक्सिजन प्लाँट उभारणार-अरविंद केजरीवाल

Abhijeet Shinde

भाजपने येडियुरप्पांच्या मुलाचं तिकिट कापलं

Abhijeet Shinde

‘भाजपच्या दडपशाहीसमोर झुकणार नाही’; काँग्रेसचा उद्या ईडी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Shinde

कन्नड अभिनेता विजय संचारी यांचे निधन

Abhijeet Shinde

उमेदवारीत महिलांना 40 टक्के हिस्सेदारी

Patil_p
error: Content is protected !!