Tarun Bharat

पबजी गेमच्या नादात गमावला जीव

Advertisements

 रावेत येथील घटना; गेम खेळताना झटका येऊन तरुणाचा मृत्यू

ऑनलाईन टीम / पिंपरी :

पबजी गेमने तरुणाईला अक्षरशः वेडे केले आहे. या वेडापायी अनेकांनी जीवही गमावला आहे, तशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी-चिंचवड जवळ रावेत येथे पबजी गेम खेळताना झटके आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेला तरुण 23 वर्षांचा आहे.

हर्षल देविदास मेमाणे (वय 23, रा. शिंदे वस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास हर्षल राहत्या घरी मोबाईलवर पबजी गेम खेळत होता. त्यावेळी त्याला झटके येवू लागले. तसेच तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने रावेत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (ता. 18) सकाळी पावणेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

हर्षल गेल्या काही वर्षांपासून काहीच काम करत नव्हता. पबजी गेम जास्त खेळल्याने त्याच्यावर ताण येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

जळगाव : 14 वर्षात 1679 शेतकऱयांच्या आत्महत्या

prashant_c

ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; 4 जखमी

prashant_c

घरकुलाचा हप्ता काढण्यासाठी अठराशेची लाच घेताना अभियांत्रिकी सहाय्यक सुहास शिंदे जाळ्यात

Abhijeet Shinde

सोलापूर : माढा तालुक्यात २७ कोरोना बाधितांची भर

Abhijeet Shinde

उजनीतून नदीला आणि कालव्याला 21 मार्चपासून आवर्तन

Abhijeet Shinde

अंगद घुगे खून प्रकरणी फरार तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!