Tarun Bharat

पम्मी आणि शेवंताची तुलना होऊ शकत नाही : अपूर्वा नेमळेकर

रात्रीस खेळ चाले 2 मध्ये शेवंता ही भूमिका गाजवल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता झी युवावरील तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मीच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षक पाहू शकतील. या भूमिकेविषयी अपूर्वाने सांगितले की, शेवंता ही भूमिका लोकप्रिय झाल्याने पम्मीसोबत तुलना होऊ शकते. पण ही तुलना करणे योग्य ठरणार नाही.  तुझं माझं जमतंय या मालिकेत मी पम्मीची व्यक्तिरेखा साकारतेय. तिचं खरं नाव हे प्रमिला आहे आणि ती एक महत्वाकांक्षी अभिनेत्री आहे. अभिनेत्री होण्यासाठी तिची धडपड चालू आहे. ती खूप श्रीमंत असून एक ना एक दिवस तिच्या वाटय़ाला एक चांगली भूमिका येईल अशी आशा मनात धरून ती सदैव अप टू डेट असते. तिला नटण्याची खूप आवड आहे. थोडी विनोदी व्यक्तिरेखा आहे. झेंडू नावाची तिची एक चेली आहे जी सतत तिच्यासोबत असते. अंकशास्त्र पम्मी खूप मानते आणि म्हणूनच तिच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तिने ट्रिपल एम लावला आहे आणि तो टॅटू तिच्या पाठीवर आहे. असे ती म्हणाली. रात्रीस खेळ चाले संपल्यावर अनेक प्रेक्षकांची अशी अपेक्षा होती कि मी पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमाकडे वळावं. एक छान व्यक्तिरेखेसोबत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस यावं. मी सुद्धा एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होती, जेव्हा माझ्या वाटय़ाला तुझं माझं जमतंय हि मालिका आली आणि जेव्हा या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला त्यानंतर मला बर्याच लोकांच्या प्रतिक्रिया मला आला. सगळ्यांना प्रोमो खूप आवडला. त्या प्रोमोमध्ये शेवंताचा उल्लेख होतो असे तिने सांगितले.

पम्मी आणि शेवंता यांची मी तुलनाच होऊ शकत नाही. कारण शेवंता या व्यक्तिरेखेचं एक उद्दिष्ट होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी नाईक कुटुंबाला तिच्या तालावर नाचवत होती. पण पम्मी ही एक विनोदी व्यक्तिरेखा आहे. तिच्या पासून कोणालाच धोका नाहीये. पम्मी हि तिच्या विश्वात जगणारी आहे. सगळ्यांचं छान व्हावं असं तिला वाटतं आणि त्यासाठी ती सगळय़ांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असते. शेवंता तशी नव्हती. शेवंता मादक होती, सुंदर होती. पण ती गरीब असल्यामुळे तिला पैशाची हाव होती. पम्मी तशी नाहीये, पम्मी खूप श्रीमंत आहे. तिचं लग्न झालंय आणि तिचा नवरा दुबईमध्ये असतो. तिच्या कडे सर्व काही आहे. ती अभिनय क्षेत्रात लवकरच खूप मोठं नाव करणार आहे असं तिला वाटतं आणि सगळ्यांना मदत करण्याच्या नादात ती या मालिकेत गम्मत आणणार आहे.  असे अपूर्वाने सांगितले.

Related Stories

राधिकाने जागवल्या आठवणी

tarunbharat

‘मेरी ख्रिसमस’चा मुहूर्त ठरला

Patil_p

‘द डर्टी पिक्चर’मधल्या अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

Tousif Mujawar

जेनिफरची बेन अफ्लेकसोबत पुन्हा एंगेजमेंट

Patil_p

सईच्या डान्सला लाइक्सची फोडणी

Patil_p

‘गहराइयां’ 11 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Patil_p