Tarun Bharat

परतावाप्रश्नी मत्स्य विकासमंत्र्यांची भेट घेणार

Advertisements

जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनचा निर्णय

मालवण : शासन दरबारी रखडलेला डिझेल परतावा आणि परतावा वितरणाबाबत शासनाने नव्याने लादलेल्या काही अटी-शर्थीच्या पार्श्वभूमीवर मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ट्रॉलर व्यावसायिकांचे म्हणणे मांडण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला. फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. डिझेल परताव्यापोटी जिल्ह्याला ८ कोटी रुपयांची गरज असताना केवळ ३१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच १२० अश्वशक्तीपासून पुढे इंजिनचा वापर करणाऱ्या नौकांना डिझेल परतावा वितरीत करू नये असा फतवा काढण्यात आला आहे, ही बाब अन्यायकारक असल्याचे यावेळी मच्छीमार म्हणाले.

Related Stories

‘पॉझिटिव्ह’ रुग्णसंख्या 99 वर

NIKHIL_N

आंबोली घाटात भले मोठे झाड कोसळून वाहतूक ठप्प

Rohan_P

खेडमध्ये आणखी 16जणांची आयसोलेशनमध्ये भर

Patil_p

‘क्वारंटाईन’ प्रक्रियेबाबत पालिका अंधारात

NIKHIL_N

जिल्हय़ात 4 लाख दुबार मतदार

Patil_p

अपंगत्व दाखल्यांसाठी दिव्यांगांची हेळसांड नको

NIKHIL_N
error: Content is protected !!