Tarun Bharat

परतीच्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसणार

प्रतिनिधी/ गगनबावडा

      सलग दोन दिवस झालेल्या संततधार पावसाने बळीराजास मोठा फटका बसणार आहे.ग्रामिण भागातील खरीप हंगामातील पिकांची नासधुस झाली आहे.ओला दुष्काळ सद्रुष्य स्थिती निर्माण झाली आहे.

      गणपती विसर्जनानंतर पावसाचा जोर कमी झाला होता.अधूनमधून निरभ्र आकाश, सूर्यप्रकाश पडत होता.त्यामूळे ग्रामिण भागातील खरीप हंगामातील भात, नाचणी,भूईमूग या पिकांची जोमदार वाढ झाली.पोटरीवर आलेल्या पिकांची लोंब बाहेर पडली.हिरवीगार पिके पिवळी धमक झाली.दोन महिन्यांवर आलेली सुगी डोळ्यासमोर उभी राहिली.याचा आनंद शेतकरी वर्गास झाला.पण परतीच्या पावसाने त्यांच्या आनंदावर पाणी पडले.

  गेले दोन दिवस संततधार पाऊस पडला.गगनबावडा तालुक्यात तर सरासरी १०० मिलीमीटर पाऊस पडला.येथील चारही प्रकल्प यापूर्वीच १०० टक्के भरले आहेत.त्यामूळे सर्वच नद्यांची पाणीपातळी कमालीची वाढली आहे.खरीप हंगामातील पिकांची नासधुस मोठ्या प्रमाणावर झाली आहे.आजपर्यंत ताठ उभी असणारी पिके कोसळून भूईसपाट झाली आहेत.उत्पादनावर यांचा विपरित परिणाम होणार आहे.रात्रंदिन रिपरिप सुरूच असल्याने पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होणार आहे.कोरोणा सारख्या महामारीला तोंड देताना नाकीनऊ आले आहे.हाताला काम नाही,दाम नाही .गेल्या सहा महिन्यांपासून बिकट अवस्था झाली आहे.अशातच खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन संकटात आणखी भर पडणार आहे.सद्या तरी ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Stories

कोल्हापूरातील किणी टोलनाका बंद करण्यासाठी मनसेचं आंदोलन; पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Abhijeet Shinde

शिरोळ तालुक्यात ८ हजार २२ आपत्तीग्रस्त कुटुंबाचे अनुदान जमा

Abhijeet Shinde

जिल्हा कबड्डी असोसिएशनकडे 81 क्रीडा संस्थांची नोंदणी

Archana Banage

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत द्या

Abhijeet Shinde

Kolhapur; ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये कोल्हापूरच्या शशांक चोथे यांचा सहभाग

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात सायंकाळपर्यंत एक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!