Tarun Bharat

परतीच्या पावसाने उडाली शेतकऱयांची झोप

हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती : पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत शेतकरी

बेळगाव  / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने तालुक्मयात धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेली पिके धोक्मयात आली आहेत. त्यामुळे शेतकऱयांची झोप उडाली आहे. अधून-मधून होत असलेल्या पावसामुळे पुन्हा शिवारात पाणीच पाणी होत आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. तालुक्मयातील 75 टक्के भातांची पोसवणी झाली आहे. तर उर्वरित भातपीक पोसवणीच्या अवस्थेत आहे. अशावेळी मोठा पाऊस झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यासाठी शेतकरी उघडिपीच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्मयात बहुतांशी भागात खरीप हंगामातील बटाटा, रताळी, भुईमूग काढणीच्या कामात बळीराजा गुंतला होता. मात्र, परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने काढणीची कामे लांबणीवर पडण्याची शक्मयता शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. मागील आठवडय़ात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने तालुक्मयातील कडोली परिसरातील हंदिगनूर, बंबरगे, मण्णिकेरी, कुरिहाळ, बोडकेनहट्टी, बंबरगे, चलवेनहट्टी, म्हाळेनट्टी यासह उचगाव परिसरातील बसुर्ते, अतिवाड, बेकिनकेरे, कोनेवाडी, कल्लेहोळ, बाची, कुदेमनी आदी परिसरातील शिवारात बटाटा, रताळी व भुईमूग काढणीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अधून-मधून होत असलेल्या परतीच्या पावसामुळे या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. आधीच बटाटा उत्पादनात कमालीची घट झाल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काही भागात उगविण्याआधीच बटाटा बियांणे कुजले होते. मात्र अद्यापही बटाटा उत्पादकांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

यंदाचे वर्ष शेतकऱयांसाठी त्रासदायक

तालुक्मयात भात पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात घेतले जाते. त्याबरोबर बटाटा, रताळी, भुईमूग व सोयाबिनचे उत्पादनही घेतले जाते. जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसाचा फटका नदीकाठी असलेल्या शेतकऱयांना बसला आहे. त्यातच तालुक्यातील बऱयाच भागात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱयांच्या चिंतेत भर पडली आहे. काही शेतकऱयांनी दुबार भात लागवड केली आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून अधून-मधून सुरू असलेल्या पावसामुळे पिके धोक्मयात आली आहेत. या सर्व समस्यामुळे यंदा शेतकऱयांचे काही खरे नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Related Stories

कोरोना नियंत्रणासाठी मनपाला 25 लाखाचा निधी

Patil_p

चार्टर्ड अकौंटंट्स बेळगाव शाखेला बहुमान

Amit Kulkarni

दैवज्ञ सुवर्णकार व्यावसायिक संघ शहापूरवतीने गरजूंना साहित्य

Patil_p

चापोली-जांबोटी रस्ताकाम अंतिम टप्प्यात

Omkar B

लोकशाहीत प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक

Patil_p

फ्लेक्स जीम मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेत मंजुनाथ कडगडागिव विजेता

Amit Kulkarni