Tarun Bharat

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

प्रतिनिधी / सांगली

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मुदतीत 30 जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संभाजी पोवार यांनी दिली.

बहुतांश विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठांकडून कोविडच्या पार्श्वभूमीवर विहित मुदतीत ऑफर लेटर प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार 30 जून 2021 पर्यंत मुदत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. सदर परिपुर्ण अर्ज
swfs.applications.2122@gmail.com या ईमेलवर पाठवून त्याची हार्डकॉपी विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्यावर सादर करावा.

असे समाज कल्याण आयुक्त यांनी कळविले आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.

Related Stories

पश्चिम बंगालचा प्रियांशु बरुआ ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता

Archana Banage

सांगली : तिकोंडीत गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

Archana Banage

जतच्या बिरनाळ तलाव पाणी आरक्षणाचा मार्ग मोकळा : आ विक्रम सावंत

Archana Banage

सांगली : आबाजी दुध उत्पादक सोसायटी अपहार प्रकरणी चेअरमन, व्हा. चेअरमन यांना केली अटक

Archana Banage

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

datta jadhav

संरक्षण मंत्रालयाच्या नव्या कार्यालयाचे आज उद्घाटन

Patil_p