Tarun Bharat

परब यांना ईडीचे नोटीस ; संजय राऊत म्हणतात, भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता

मुंबई / ऑनलाईन टीम

राज्यातील परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे नोटीस कोणत्या कारणासाठी पाठवण्यात आले आहे यासंबंधी कोणतेही माहिती समोर आलेली नाही. भाजपची जनआशीर्वाद यात्रा संपताच हे नोटीस पाठवण्यात आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र यावरून शिवसेना नेते खासजदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत एक सूचक ट्वीट केले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करते म्हटले आहे की, शाब्बास!जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये, असे म्हणत त्यांनी कायदेशीर लढाई कायदयानेच लढू.. असे म्हटले आहे. शेवटी त्यांनी जय महाराष्ट्र म्हटले आहे.

Related Stories

लताजींना अनोखी श्रद्धांजली

Patil_p

संतांची, वारकऱ्यांची अवहेलना थांबवा; नाहीतर राज्यव्यापी आंदोलन

Tousif Mujawar

सोलापूर शहरात ५७ कोरोना पॉझिटीव्ह तर ४ मृत्यू

Archana Banage

सांगितल्याशिवाय घर न सोडण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना; आयकरच्या छाप्यांवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Archana Banage

येरवडा कारागृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार

Tousif Mujawar

जिह्यात कोरोनाच्या केवळ 21 चाचण्या

Patil_p