Tarun Bharat

परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ? सिंह यांचे निकटवर्तीय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Advertisements

ऑनलाईन टीम

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यानंतर सिंह यांच्यावर अनेक ठिकाणी खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यानंतर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली. यात आणखी एका प्रकरणामुळे भर पडली आहे.

सिन्नरमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून कोट्यवधींची जमीन खरेदी केल्याप्रकरणी परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय संजय पुनुमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंग यांच्याशी संबंधित एका खंडणीच्या गुन्ह्यात संजय पुनुमिया सहआरोपी आहेत. संजय पुनिमिया विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या जमीन व्यवहारात परमबीर सिंह भागीदार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

संजय पुनुमिया यांनी मुंबई-समृद्धी महामार्गालगत नाशिक येथे जमिन खरेद केली आहे. शेतकरी असल्याचं भासवून पुनुमियान यांनी सिन्नरमध्ये शेतजमीन खरेदी केली आहे. त्यानंतर संजय पुनिमिया यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र सध्या परमबीर सिंह जामीनावर बाहेर असून ते फरार असल्याचे वृत्त आहे. ते सध्या कुठे आहेत याचा शोध सुरु आहे.

Related Stories

अन माजी शिक्षण सभापती हादगे यांची सतर्कता

Patil_p

महाविकास आघाडी सरकारने मराठा तरुणांचा बळी घेतला : नरेंद्र पाटील

Archana Banage

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी पवनकुमार बन्सल

datta jadhav

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी घेतली फडणवीसांची भेट

Archana Banage

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात गेल्या वर्षी ४८ हजार लोकांनी गमवाला जीव

Archana Banage

सलमान खानला धमकीचे पत्र पाठविणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Archana Banage
error: Content is protected !!