Tarun Bharat

परराज्यातून आलेल्या नागरिकांबद्दल स्थानिक सतर्क

प्रतिनिधी/ बेळगाव

प्रशासनाकडून ई-पास मिळवून बेळगाव शहर व जिह्यातील वेगवेगळय़ा गावांत परराज्यातून दाखल झालेल्या नागरिकांबद्दल आता स्थानिक सतर्क झाले आहेत. स्वतःहून त्यांच्या विषयी प्रशासनाला माहिती देत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीवरुन आरोग्य यंत्रणा कामाला लागत आहे.

आरोग्य सिंधूऍपच्या माध्यमातून वेगवेगळय़ा राज्यात अडकलेले बेळगावातील नागरिक हळूहळू बेळगावला परतत आहेत. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरुन येणाऱयांची कोगनोळी तपास नाक्मयावर तपासणी करुनच त्यांना पुढे पाठविण्यात येत आहे. अन्य मार्गाने बेळगावला आलेल्यांवर नजर ठेवण्यात आली आहे.

पुण्याहून परतलेल्या भाग्यनगर येथील तिघा जणांना होमक्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला होता. मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांच्या विषयी शनिवारी माहिती देवून पुण्याहून आलेल्यांना घरी का ठेवता, त्यांचीही तपासणी करा, अशी माहिती दिल्यामुळे पोलीस व आरोग्य विभागाने या परिसरातील तिघा जणांना तपासणीसाठी सीपीएड मैदानावर बोलविले.

नियमानुसार ई-पास घेवून परराज्यातून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळेच सीपीएड मैदानावर त्यांना बोलावून त्यांची तपासणी केली जाते. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ग्रीन झोनमधून आलेल्यांना होम क्वारंटाईनची मुभा दिली जात होती. गेल्या तीन दिवसांपासून आता त्यांनाही संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे.

108 कोरोनाबाधित रुग्ण संख्या असलेल्या बेळगाव जिह्याचा क्रमांक संपूर्ण राज्यात दुसरा आहे. हिरेबागेवाडी येथील एका वृध्देचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 56 जण बरे झाले आहेत. उर्वरित 59 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.

8 अहवाल निगेटिव्ह

गेल्या 24 तासात बेळगाव येथून पाठविण्यात आलेले 8 अहवाल निगेटिव्ह आले असून प्रशासनाला आणखी 81 अहवालांची प्रतिक्षा आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार 89 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे होते. शनिवारी ही संख्या 81 झाली आहे. यावरुन आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिह्यातील 99 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

Related Stories

सुवर्णसौध परिसरात राष्ट्रपुरुषांचे पुतळे बसवा

Patil_p

स्टेशन रोडवर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

सलग तीन दिवस शहरातील पाणीपुरवठा ठप्प

Omkar B

आरोग्य स्वच्छतेविषयी जागरुकता कार्यक्रम

Patil_p

सीआयडी पथक अखेर दाखल

Amit Kulkarni

कारवार जिल्हय़ातील तलावांचा विकास करा

Amit Kulkarni