Tarun Bharat

परळी खोयात कोरोना पुन्हा सक्रिय होतोय

Advertisements

वार्ताहर / परळी

कोरोणाची दाहकता गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिह्याने अनुभवली आहे. त्याचबरोबर बाधित मृतांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात थरकाप उडत आहे. परंतु परळी ठोसेघरच्या आरोग्य विभागाच्या सातर्कतेने परळी खोयातून हद्दपार झालेला कोरोना पुन्हा सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार ठोसेघर विभागातील राजापुरी 1, सोनवडी 8, गजवडी 1, आरे 1 असे एकूण 11 रुग्ण वाढले असून त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

    चौथा लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळाली आणि मुंबईहून आपल्या मायभूमीत परतनारायणाची संख्याही ही वाढू लागली. यामुळे जिह्यात कोरोनाचा कहर हा होणार हे निश्चित होतं  त्यातच परळी खोयातील बहुतांश तरुण वर्ग हा मुंबई पुणे येथे नोकरी साठी स्थित आहे  तो परतल्याने परळी भागातही  ही भीतीचे वातावरण होतेच. परळी खोयात पहिला रुग्ण हा 19 मे रोजी रायघर येथे आढळल्यानंतर कोरोना चा संसर्ग थांबवणे तसेच त्यांची साखळी तोडणे हे आरोग्य विभागाला एक आव्हानच होते.  त्याचबरोबर ठोसेघर आरोग्य विभागाच्या हद्दीतील रायघर 3, कारी 4, चाळकेवाडी 1, वावदरे 4, राजापुरी 5, आरे 2, गजवडी 3, सोनवडी 12 या गावांमध्ये तर परळी विभागातील परळी 20, बनघर 1 , कूस बुद्रुक 6, कूस खुर्द 4, खडगाव 3, निगुडमाळ 5, धावली 4, लूमनेखोल 2, आंबवडे बुद्रुक 1, सावली 1 या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला असून कारी 1 , राजापुरी 1, गजवडी 1, परळी 1, कूस बुद्रुक1 , लूमनेखोल 1 आशा एकूण 6 बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.     परळी खोयातून हद्दपार झालेल्या कोरोना दबक्या पावलाने पुन्हा सक्रीय होत असल्याने परळी तसेच ठोसेघर आरोग्य विभागाला एक मोठे आव्हानच आहे त्याच बरोबर या रुग्णांची साखळी देखील लक्षात येत नसल्याने तसेच काही नागरिकांकडून माहिती लपवली गेल्याने भागातील कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी कोरोणाला न घाबरता आपल्या नातेसंबंधात दुरावा नंतर आपण आपल्या कुटुंबीयांची तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत तसेच आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोणाला पुन्हा परळी खोयातून हद्दपार करूया असे आवाहन आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना करण्यात आले आहे

Related Stories

शेतकयांच्यावर होत असलेल्या अन्यायाला कोण वाली

Patil_p

बार्शीतील 14 जण सोलापूरला हलवले, आता लक्ष रिपोर्टवर

Abhijeet Shinde

राज्यात ६ जून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार

Abhijeet Shinde

सातारा : नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विकास जाधव

datta jadhav

साडेचार लाख रुपयांच्या तांब्याच्या तारेची चोरी

datta jadhav

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; 13 प्रमुख राज्यांमध्ये झाले सर्वेक्षण

Rohan_P
error: Content is protected !!