Tarun Bharat

पराठा रोटी

साहित्य : 1 वाटी तांदळाचे पीठ, 2 बटाटे वाफवून, 3 चमचे कोथिंबीर बारीक चिरून, पाव वाटी बारीक चिरलेली मेथी भाजी, 4 ते 5 लसूण पाकळय़ा चिरून, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी

कृती : बाऊलमध्ये तांदळाचे पीठ चाळून घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा गोळा मळावा. हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला लावून पेस्ट बनवावी. आता बाऊलमध्ये बटाटे मॅश करून त्यात हिरवी मिरची-लसूण पेस्ट, मेथी भाजी आणि मीठ मिक्स करून सारण तयार करावे. मळलेल्या तांदळाच्या पीठाचा छोटा गोळा घेऊन त्यात तयार बटाटय़ाचे सारण भरावे. हाताचा तळवा पाण्याने ओला करावा. तळव्याच्या सहाय्यानेच त्याचा पराठा थापावा. आता गॅसच्या मंद आचेवर तवा गरम करून त्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवावेत. त्यावर तयार पराठा टाकून दोन्ही बाजूने लालसर भाजावा. आता तयार पराठा रोटी सॉससोबत खाण्यास द्या.

Related Stories

चटपटीत पालक चना सूप

Amit Kulkarni

लज्जतदार ब्रेड ढोकळा

Amit Kulkarni

मस्त मिल्क केक

Omkar B

सोया पुरी

Omkar B

मस्त खुसखुशीत बेसन वडी खायचीयं; जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

पावसाळ्यात ट्राय करा कुरकुरीत मुगडाळ भजी

Kalyani Amanagi