Tarun Bharat

‘पराली’ करणार शेतकऱयांचे कल्याण

Advertisements

दरवषी खरीप हंगाम संपल्यानंतर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश इत्यादी भागांमध्ये शेतात शिल्लक उरलेले गवत जाळले जाते. या गवताला पराली असे म्हणतात. या परालीचा धूर दिल्लीवासियांच्या डोळय़ांतून प्रदूषणाचे पाणी काढतो. हिवाळय़ात दिल्लीच्या प्रदूषणाला हे गवत जाळणे जबाबदार मानले जाते. तथापि, आता ही समस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. पराली जाळण्याऐवजी या गवतापासून इंधन वायू बनविण्याचा कारखाना पंजाबमध्ये लवकरच सुरू होत आहे.

गवतापासून इंधन वायू बनविणारा हा कारखाना भारतातील सर्वात मोठा असेल. यामुळे गवत शेतात जाळावे लागणार नाही. तर ते उपटून कारखान्यात नेऊन त्यापासून जैविक इंधन बनविण्यात येईल. त्यामुळे धूर प्रदूषणाची समस्या सुटेलच शिवाय मोठय़ा प्रमाणात जैविक इंधनही मिळेल. हा कारखाना 220 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह तयार होत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तो सुरू होईल. एक वर्षात या कारखान्यात 1 लाख टन गवताचे इंधनात रूपांतर करण्यात येईल. एकटय़ा पंजाबमध्ये दरवषी 2 कोटी टन गवत निघते. त्या तुलनेत या कारखान्याची क्षमता सध्या अत्यल्प असली तरी भविष्यकाळात असे अनेक कारखाने निर्माण होऊन शेतातले गवत हे जैविक इंधनाचा एक मोठा स्रोत म्हणून समोर येईल, अशी शक्मयता संशोधकांनी व्यक्त केली आहे. पंजाब सरकार शेतातून गवत काढण्यासाठी अनुदान देणार आहे. शेतकरी हे गवत जाळण्याऐवजी विकू शकतात. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही भर पडण्याची शक्मयता आहे. एकंदर सध्या प्रदूषणाचे कारण ठरणारे हे गवत नजीकच्या भविष्यकाळात जैव इंधनाचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणून पुढे येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

Related Stories

बेंगळुरात रेव्ह पार्टीवर छापा

Patil_p

चिंता वाढली : उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 20 हजार पार

Rohan_P

कमर्शियल सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त

Patil_p

आंदोलनजीवी_हूँ_जुमलाजीवी_नहीं हा आजचा Top Trending हॅशटॅग ; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मराठीमधून दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Abhijeet Shinde

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असणारा दीप सिद्धू अटकेत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!